हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्राजक्ता माळी बस नाम काफी है! अशी काहीशी ओळख या अभिनेत्रीने बनवली आहे. मोहक सौंदर्य आणि लीलया विविध भूमिका साकारण्याची तिची शैली तिला प्रेक्षकांच्या मनात कायमस्वरूपी वसवते आहे. प्राजक्ताचा स्वतःचा असा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. जो तिला सोशल मीडियाच्या माध्यमातून फॉलो करतो. यामुळे अनेकदा विविध फोटो, व्हिडीओ ती आपल्या चाहत्यांसह शेअर करताना दिसते. त्यात प्राजक्ताचं साडी प्रेम तर आपण जाणतोच. आताही तिने लाल रंगाच्या साडीतील काही फोटो शेअर केले आहेत. पण हे फोटो तिला आधीच शेअर करायचे होते असे तिने स्वतःच सांगितले आहे.
प्राजक्ताने यातील एका पोस्टमध्ये शेअर केलेल्या फोटोसह कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, आजचा रंग लाल, अस म्हणत कधीच हे फोटो post करायचे होते.. पण राहीलच…असो, माझ्यासाठी आजचा रंग लाल. तर अन्य एक पोस्ट शेअर करत ‘यह लाल इश्क़, यह मलाल इश्क़… यह ऐब इश्क़, यह बैर इश्क़….। उर्वरीत लाल रंग.’. एकंदरच प्राजक्ताच्या या फोटोंसह दिलेल्या कॅप्शनवरून एक गोष्ट लक्षात येते आणि ती म्हणजे अशी कि, प्राजक्ताला हे लाल रंगाच्या साडीतील फोटो नवरात्रीतील लाल रंगाच्या दिवशी शेअर करायचे होते. पण काही कारणास्तव राहिल्यामुळे आता राहवून तिने हे फोटो शेअर केले आहेत.
प्राजक्ताने शेअर केलेले हे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. यावर नेटकरी विविध प्रतिक्रिया देखील देत आहेत. यावर एका नेटकऱ्याने लिहिले आहे कि, ‘उफ्फ्.. हाय्… ये लाल रंग कब हमें छो..डेगा.(सहज़ सुचल् म्हणून छापलं)’. तर अन्य एकाने लिहिले आहे कि, ‘मराठमोळा साज हवा तर साडीशिवाय नाही शोभा’. याशिवाय आणखी एकाने कमेंट करीत लिहिले आहे कि, ‘प्राजु तुझ्या सौंदर्याची व्याख्या करता येत नाही फक्त माझ्या हृदयात ठेवली आहे महाराष्ट्राची राणी आणि माझ्या हृदयाची राणी’. इतकेच नव्हे तर आणखी एकाने लिहिलंय कि, ‘प्राजक्ता नाम सुनकर flower समझे क्या..? Fire है अपुन fire..’
Discussion about this post