Take a fresh look at your lifestyle.

‘काल आयुष्यात पहिल्यांदा राजकीय सभा अनुभवली’; प्राजक्ताने सांगितला मनसे मेळाव्याचा अनुभव

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। यंदाच्या गुढीपाडव्यानिमित्त आयोजित मनसे पक्ष मेळाव्यासाठी अनेक मुंबईकर जमा झाले होते. दादरमधील शिवाजी पार्क मैदानात तब्बल दोन वर्षांनंतर हा पाडवा मेळावा पार पडला. या मेळाव्याला मराठी चित्रपटसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी हिनेदेखील हजेरी लावली होती. या मेळाव्यात आपण आहोत याचा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी तिला राजकीय पक्षात प्रवेश केलास की काय..? असे विचारले. म्हणूनच चाहत्यांचा गैरसमज टाळण्यासाठी तिने कॅप्शनमध्ये सुरुवातीलाच स्पष्ट केलं कि तिने राजकीय पक्षात प्रवेश केलेला नाही. तसेच ‘काल आयुष्यात पहिल्यांदा राजकीय सभा अनुभवली’, असं तिने या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. त्यामुळे हि पोस्ट चांगलीच चर्चेत आहे.

या पोस्टमध्ये प्राजक्ताने लिहिले आहे कि, ‘नाही नाही, कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश केला नाही. काल आयुष्यात पहिल्यांदा राजकीय सभा अनुभवली (खूप दिवसांपासून अनुभवायचीच होती) ते फक्त तुमच्याबरोबर शेअर करतेय, इतकाच हेतू. कलाकार नंतर आधी मी माणूस- सामाजिक प्राणी आहे. त्याच्या समृद्धीकरता पण झटायला हवं. जसं फिल्मफेअर जाणं गरजेचं तसंच हेही, म्हणून हा घाट. (After all आता माझ्या आधार कार्डवर मुंबईचा पत्ता आहे), अशी पोस्ट प्राजक्ताने लिहिली आहे. यासोबतच तिने #सर्वांगीणविकास #समग्रजीवन #राजकारण #मुंबई असे हॅशटॅग दिले आहेत.

प्राजक्ताच्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी आणि अन्य नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. यातील एकाने लिहिले कि, ‘कौतुक करावं तेवढं कमीच’. तर अन्य एका नेटकऱ्याने प्रश्नार्थक कमेंट करीत विचारले कि, कसा होता अनुभव. आणखी एकाने लिहिले कि, ‘काही का असेना पण हा वेळ वाया जाणार नाही, काहीतरी फायदा नक्कीच होणार’. तसेच आणखी एकाने लिहिले कि, आपली जात नंतर ,आधी आपण हिंदू आहोत हे लक्षात ठेवले पाहिजे. या पाडवा मेळाव्यात मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी आक्रमकरित्या हिंदुत्वाची भूमिका मांडली. दरम्यान तुम्ही जसं राजकारण केलं तसंच समोरचे राजकारण करणार, असं सांगत राज यांनी भाजपच्या भूमिकेचे समर्थन केले. यामुळे राज्यातील महाविकास आघाडीच्या कामावर टीका केल्याचे स्पष्ट दिसून आले.