हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आज दिनांक २७ फेब्रुवारी असून सर्वत्र ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा केला जातो. आजच्या या खास दिवसानिमित्त विविध ठिकाणी विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात. आजच्या या दिवसाचे खास औचित्य साधून मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीने आपल्या चाहत्यांना अतिशय वेगळ्या शैलीत शुभेच्छा दिल्या आहेत. पारंपरिक मराठमोळ्या पेहरावातील फोटोसोबत तिने कॅप्शनमध्ये ‘मराठी भाषा दिना’निमित्त एक सुंदर पोस्ट शेअर केली आहे. जी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अभिनेत्री प्राजक्ता माळीने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर हि पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलं आहे कि, ‘प्रेम म्हणजे वणवा होऊन जाळत जाणं.. प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत राहणं… प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं.. मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं…. कवीश्रेष्ठ कुसूमाग्रजांनी लिहिलेल्या ह्या ओळींसारखंच प्रेम आहे माझं, माझ्या “मराठीवर”….जे आहे आज, राहील उद्या , परवा..मरणोत्तरही…… ”मराठी भाषा गौरव दिनाच्या” महाराष्ट्राला आभाळभर शुभेच्छा…. (फोटोंमधले अलंकार अर्थातच मराठी पारंपरिक अलंकारांसाठी वाहिलेल्या उपक्रमातील आहेत… “प्राजक्तराज”’
अभिनेत्री प्राजक्ता माळीने अशा प्रकारे एका वेगळ्या शैलीत आणि एका वेगळ्या अंदाजात संपूर्ण महाराष्ट्राला ‘मराठी भाषा गौरव दिना’निमित्त खास शुभेच्छा दिल्या आहेत. प्राजक्ताच्या या पोस्ट्सवर तिच्या चाहत्यांनीसुद्धा कमेंट करीत तिला ‘मराठी भाषा दिना’च्या शुभेच्छा दिल्या आहेत. इतकेच नव्हे तर या खास पोस्टसोबत तिने जोडलेला स्वतःचा पारंपरिक पेहरावातील फोटो देखील नेटकऱ्यांची पसंती मिळवत आहे. हा पेहराव पूर्ण करण्यासाठी प्राजक्ताने तिच्या ‘प्राजक्तराज’च्या माध्यमातून जगासमोर आलेल्या ‘सोनसळा’ या पारंपरिक अलंकारांचा वापर केला आहे. मुख्य म्हणजे या अलंकाराची ओळख करून देताना प्राजक्ताने सांगितले होते कि, ‘ह्या शृंखलेतील अलंकार तांबं ह्या धातूत घडवून त्यांना सोन्याचं प्लेटिंग केलं आहे. बहुतांश सर्व मराठी अलंकार हे सोन्यात घडवले जातात… पण सर्वसामांन्यांना परवडावेत या हेतूनं हा नवा प्रयोग आम्ही केला आहे’.
Discussion about this post