Take a fresh look at your lifestyle.

तिला जज करू नका.. बघण्याचा दृष्टीकोन बदला; BOLDटीझरनंतर ट्रोल होणाऱ्या प्राजक्ताला चाहत्यांची साथ

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्लँनेट मराठी या ओटीटी प्लॅटफॉर्मकडून सध्या दर्जेदार कलाकृतींची निर्मिती केली जात आहे. नुकतंच त्यांनी एका वेब सिरीजची घोषणा केली आहे ज्याचे नाव ‘रानबाजार’ असे आहे. या वेब सिरीजचे नाव जितके वेगळे आहे त्याचे टिझरही तितकेच लक्षवेधी. या टीझरमध्ये बोल्ड आणि बिंदास तेजस्विनी पंडीतसह सोज्वळ आणि सुंदर प्राजक्ता माळीचे अत्यंत बोल्ड सीन दाखवण्यात आले आहेत. यामुळेच सध्या सोशल मीडियावर एकतर हे टिझर प्रचंड चर्चेत आहेत आणि या अभिनेत्री ट्रोलर्सच्या निशाण्यावर. मुख्य म्हणजे तेजस्विनी तर बोल्ड पात्रांसाठी नेहमीच चर्चेत राहिली आहे पण प्राजक्ता माळी..? तिने आतापर्यंत अशी भूमिका न केल्यामुळे सोशल मीडियावर तिच्याबद्दल बोलणाऱ्यांची संख्या जरा जास्तच आहे. पण प्राजक्ताचे चाहते तिच्यावर होणार ट्रोलिंग अगदी सौम्य पाने परतवून लावताना दिसत आहेत.

अभिनेत्री प्राजक्ता माळी हीचा स्वतःचा असा एक वेगळा चाहता वर्ग आहे. जो तिच्यावर प्रचंड प्रेम करतो आणि तिला पाठिंबाही देताना दिसतो. तर याहीवेळी असच झालंय. प्लॅनेट मराठीची रानबाजार हि वेब सिरीज येईल तेव्हा येईल. पण तूर्तास रिलीज झालेल्या या टीझरमध्ये प्राजक्ता माळी प्रणय प्रसंग करताना दिसते आहे. निश्चितच यावर विश्वास ठेवणे कठीण आहे पण हेच खरे आहे. हि वेब सिरीज काहीतरी नवीन धमाका घेऊन येतेय इतकं नक्की. मुख्य म्हणजे यांच्या कॅप्शनमध्ये स्पष्ट लिहिलंय कि, वेबविश्वाला हादरवून टाकणारा ‘रानबाजार’.

हा टिझर शेअर करताना प्राजक्ताने लिहिलं होत कि, प्रत्येक कलाकाराला आपल्या कारकिर्दीत विविधांगी भूमिकांमध्ये झळकण्याची, समाजात अस्तित्वात असणारी विविध पात्रं साकारण्याची, सतत काहितरी नवं करण्याची इच्छा असते. मी त्याला अपवाद नाही. लहानपणापासून स्मिता पाटील, रंजना यांना बघत मोठी झाले, (मी त्यांच्याइतकी मोठी नक्कीच नाही.) पण त्यांच्या कारकिर्दीतून प्रेरीत होऊन आणि तुम्हां मायबाप रसिक प्रेक्षकांवर विश्वास ठेवून केलेला हा प्रयत्न.. माझ्यातल्या अभिनेत्रीवर विश्वास ठेवून माझ्या पदरी ही भूमिका टाकल्याबद्दल our captain of the ship @abhijitpanse व मराठीतील सगळ्यात मोठी web series बनवल्याबद्दल@planetmarathiott @akshaybardapurkar ह्यांचे आभार. आतापर्यंत माझ्यावर व माझ्या कामांवर जसं प्रेम केलत, जो पाठींबा दिलात; तसाच या ही web Series ला द्याल अशी आशा व्यक्त करते. तुमचीच प्राजक्ता… या नंतर तिला प्रचंड ट्रॉलिंगला सामोरे जावे लागत असताना चाहत्यांनी मात्र तिची साथ सोडलेली नाही.

अभिनेत्री प्राजक्ता माळीने आपल्यावर होणाऱ्या वैयक्तिक टीकांवर कोणतीही प्रतिक्रिया अद्याप दिलेली नाही. मात्र तिच्यावर होणाऱ्या टीका तिच्या चाहत्यांना सहन होत नसल्याचे दिसून येत आहे. तिच्या एका चाहत्याने पाठराखण करत म्हटलेय कि, ‘वेब विश्वाला हादरवून टाकणारी वेब सिरिज येतीय रानबाजार. आजवर जसं प्राजक्ताच्या अनेक भूमिकांना प्रेम व प्रतिसाद दिला तसंच या भूमिकेला सुद्धा द्याल अशी अपेक्षा आहे. आणि ही वेब सिरिज बघताना कसलाही चुकीचा विचार मनात आणू नका. टीजर बघून प्रत्येकाला असं वाटलं असेल की हे चुकीच पाऊल उचललं आहे प्राजक्ताने. तर तुम्ही तिला असं जज नका करू. मुळात तुमचा बघण्याचा दृष्टीकोन बदला अशी विनंती आहे . १८ मे ला ट्रेलर येतोय नक्की पहा. आपलाच प्राजक्ताचा फॅन..’ हि पोस्ट प्राजक्ताने आपल्या स्टोरीमध्ये शेअर केली आहे.