Take a fresh look at your lifestyle.

प्रार्थना बेहरे आणि भूषण प्रधानचा ‘अजिंक्य’ आला रे..; 19 नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहात होणार प्रदर्शित

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील मराठमोळा प्रसिद्ध अभिनेता भूषण प्रधान आणि सुंदर चेहरा व मोहक हावभावाच्या जीवावर तरुणांच्या जीवाचे हाल करणारी मराठमोळी अभिनेत्री प्रार्थना बेहरे हे दोघेही पहिल्यांदाच एकत्र एकाच चित्रपटात दिसणार आहेत. एका नव्या धाटणीचा ‘अजिंक्य’ हा चित्रपट घेऊन प्रार्थना आणि भूषण लवकरच प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहेत. नुकताच या चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ल्युमिनरी सिनेवर्ल्ड आणि एक्झॉटेक मीडिया प्रा. लि. यांचा हा चित्रपट येत्या १९ नोव्हेंबर २०२१ रोजी सर्वत्र चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

‘अजिंक्य’ या चित्रपटाचे कथानक अत्यंत ग्रामीण आणि नगरी भागांत सातत्याने दिसत असलेल्या आर्थिक परिस्थितीवर भाष्य करणारे आहे. या चित्रपटाचा हॅशटॅग “अजिंक्य आला रे” असा आहे. या हॅशटॅगचा वापर करत सोशल मीडियाद्वारे त्यांनी चित्रपटाची प्रदर्शनाची घोषणा केलीहोती . यानंतर ‘अजिंक्य’ चित्रपटाची सर्वत्र चर्चा असताना अखेर आता ट्रेलर समोर आला आहे. चित्रपटाच्या ट्रेलर’मध्ये अजिंक्य’च्या दमदार भूमिकेत भूषण प्रधान दिसत आहे. भूषणचा “कॉर्पोरेट लूक” अत्यंत लक्षवेधी आहे. तर यासोबत प्रार्थनाचे सुंदर आणि सोज्वळ असे पात्र यात दिसतेय. या चित्रपटात जेष्ठ अभिनेते उदय टिकेकर, अरुण नलावडे, गणेश यादव, अनिकेत केळकर, प्रसाद जवादे, पद्मनाभ बिंब, त्रियुग मंत्री,अभिनेत्री वंदना वाकनीस आणि पल्लवी पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

अजिंक्य चित्रपटाचे दिग्दर्शन अ.कदिर यांचे आहे तर निर्मिती सूत्र नीरज आनंद यांच्या हाती होती. शिवाय रोहन- रोहन या जोडीने या चित्रपटाला संगीत दिले आहे. गीतकार किरण कोठावडे लिखित ”अलगद अलगद” हे गाणे रोहन प्रधान आणि मीनल जैन यांनी गायले आहे. या गाण्याला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. तसेच, गायक रोहन गोखले यांच्या दमदार आवाजातील ”स्वप्नांना…” हे प्रोत्साहनपर गीत तरुणाईला नवी ऊर्जा देणारं गाणं आहे.

शिवाय आजच्या पिढीतलं “माझे फेव्हरेट राव” हे आयटम सॉंग प्रेक्षकांना ताल धरायला लावेल असेच आहे. तर मनाला भिडणार ”आता तरी बोल ना” हे भावनिक गाणं मनोज यादव यांनी लिहिलेलं असून गायक सुरज जगन आणि स्वप्नील बांदोडकर यांच्या सुरेल आवाजात ऐकायला मिळणार आहे.