Take a fresh look at your lifestyle.

प्रार्थना बेहरेच पेंटिंग पाहिलं का? पहाल तर तुम्हीही म्हणाल किती ते सुंदर

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेत्री प्रार्थना बेहरे ही एक उत्तम अभिनेत्री आहेच पण सोबतच तिच्यात आणखी अनेक कला वास करतात. प्रार्थना खूप छान अभिनय करते, नृत्य करते, जेवण बनविते आणि आता तर चक्क पेंटिंग पण करतेय. तिचा पेंटिंग करतानाचा व्हिडिओ तिने नुकताच सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर केला असता काही क्षणातच प्रचंड वायरल झाला आहे. चाहत्यांसह अनेक सहकलाकारांनी देखील तिच्या या व्हिडिओवर कमेंट्स केल्या आहेत.

सध्या प्रार्थना सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती तिचे फोटो, व्हिडिओ नेहमीच चाहत्यांसोबत शेअर करत असते. प्रार्थनाने शेअर केलेल्या या व्हिडिओत तिने सुंदर फुलांचे पेंटिंग केले आहे. तिने हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर अगदी तासाभरातच ८६ हजाराहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला. तसेच हा व्हिडीओ पाहून अनेक कलाकारांनी कमेंट्स करीत प्रतिक्रिया दिलूया आहेत. सुयश टिळक, ऋतुजा बागवे, सोनाली कुलकर्णी, मयुरी देेशमुख यांसारख्या कळकरांनी तिचे हे पेंटिंग खूप चांगले असल्याचे सोशल मीडियाद्वारे तिला सांगितले आहे. सोनालीने तर ह्या पेंटिंगला पाहून ‘मला हवंय’ अशी कमेंट केली आहे.

प्रार्थना बेहरे लवकरच छूमंतर या मराठी चित्रपटात दिसणार आहे. यात तिच्यासोबत रिंकू राजगुरू, सुव्रत जोशी आणि ऋषी सक्सेना मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे काही सीन्स लंडनमध्ये चित्रित झाले आहेत. त्याचबरोबर ती एका हिंदी वेबसीरिजमध्ये देखील दिसणार आहे. प्रार्थनाने आपल्या करिअरची सुरुवात छोट्या पडद्यावरुन केली. मात्र त्यानंतर ‘जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा’ या मराठी चित्रपटातून पदार्पण करीत तिने रसिकांचे मन जिंकले. त्यानंतर कॉफी आणि बरंच काही, मिस्टर एंड मिसेस सदाचारी, मितवा, वॉट्सअप लग्न, मस्का अशा विविध मराठी चित्रपटांत तिने काम केले आहे.