Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

तूच आहेस माझी ‘चंद्रमुखी’; सहजीवनाची 25 वर्ष साजरी करत प्रसाद- मंजिरीने केलं पुन्हा प्रेम व्यक्त

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
January 7, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Prasad_Manjiri
0
SHARES
76
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेता प्रसाद ओकने गेल्या काही काळात स्वतःच्या नावाचा जणू एक ब्रँड बनवला आहे. अभिनेता, दिग्दर्शक, लेखक अशा विविध माध्यमातून प्रसादने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली आहे. कठीण- सुखद अशा विविध भावनिक प्रसंगांना तोंड देऊन त्याने आज भव्य यश मिळवले आहे आणि या यशात त्याच्यासोबत प्रत्येक पावलावर साथ देणारी त्याची पत्नी नेहमीच त्याचा आधारस्तंभ राहिली आहे. प्रसादही नेहमीच त्याची पत्नी मंजिरीवरील प्रेम विविध पद्धतीने व्यक्त करताना दिसतो. पण आजचा दिवस फारच खास आहे. खास म्हणजे आज प्रसाद आणि मंजिरी यांच्या लग्नाचा २५ वा वाढदिवस आहे. यानिमित्त मंजिरीने प्रसादसाठी खास प्रेम व्यक्त करणारी भन्नाट पोस्ट शेअर केली आहे. तर प्रसादनेसुद्धा यावर कमाल कमेंट करीत आपले प्रेम व्यक्त केले आहे.

View this post on Instagram

A post shared by Manjiri Oak (@manjiri_oak)

विविध फोटोंसह मंजिरीने कॅप्शनमध्ये प्रसादसाठी एक भली मोठी पोस्ट शेअर केली आहे. यात तिने लिहिलंय कि, ‘प्रिय प्रसाद…९३ साली आपली खऱ्या अर्थानी ‘प्रेमाची गोष्ट’ सुरू झाली. अर्थात त्याआधी तू मला बराच काळ ‘अधांतर’ ठेवलं होतंस आणि त्यामुळे आपल्यामध्ये काही दिवस ‘रणांगण’ तापलं होतं…

View this post on Instagram

A post shared by Manjiri Oak (@manjiri_oak)

पण हळूहळू ‘अशी बायको हवी’ म्हणत तू ‘एकदा पहाव करून’ असंही म्हणालास आणि आपण लग्न करु का नाही असं वाटणाऱ्या लोकांचा ‘भ्रमाचा भोपळा’ फोडलास आणि शेवटी ही ‘साहेबजी डार्लिंग’ झालेच आणि ‘धन धना धन’ असा आपला संसार सुरू झाला. तो चालू असताना तुला अनेकदा मला मनवताना ‘बोल बेबी बोल’ म्हणावं लागलं आणि मला पटवावं लागलं की खरंच ‘मी बबन प्रामाणिक’ आहे.’

View this post on Instagram

A post shared by PRASAD OAK : प्रसाद ओक (@oakprasad)

पुढे ती म्हणाली कि, ‘पण तुला लवकरच कळलं की मीच या घराची ‘सूत्रधार द बॉस’ आहे. अर्थात तुला ती संधी मी ‘आलटून पालटून’ देत होते . ह्यालाच म्हणत असतील का सुखी संसाराची ‘नांदी’….??? आपला पुण्याचा ‘वाडा चिरेबंदी’ सोडून आज २५ वर्ष झाली. पण तुझ्या बरोबरच्या अनेक सुख दुःखाची ही ‘बेचकी’ तोडून आज ही मी तुझ्या बरोबर एका ‘मग्न तळ्याकाठी’च बसलीय असंच वाटतं. त्यामुळे पुढची २५ वर्ष एकमेकांना ‘तू म्हणशील तसं’ म्हणतच राहुयात.’

मंजिरीच्या या पोस्टवर प्रसादने कमेंट केली आहे. या कमेंटमधून त्याने प्रेम व्यक्त करत लिहिलंय कि, ‘तूच होतीस ‘कच्चा लिंबू’, तूच झालीस आपल्या मुलांची ‘हिरकणी’, तूच आहेस माझी ‘चंद्रमुखी’, असंच आनंदात जगू ‘हाय काय नाय काय’.’ मंजिरी आणि प्रसाद यांची जोडी सिने विश्वातील अत्यंत लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. आज त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे चाहतेही भरभरून या जोडीवर आशीर्वाद आणि शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

Tags: Instagram PostManjiri OakPrasad OakTrending Coupleviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group