Take a fresh look at your lifestyle.

लैच भारी ‘कलावंतीन’ हाय आमची ‘चंद्रा’; अम्मूच्या पोस्टवर प्रसादने केलं चंद्राचं कौतुक

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या महिन्यात २९ एप्रिल २०२२ रोजी मराठी सिनेसृष्टीत डोळ्यात अंगार आणि मनात प्रेमाचा भंडार घेऊन चंद्रमुखी प्रेक्षकांच्या भेटीस आली. या चित्रपटातून चंद्राने अशी काही जादू केली आहे कि सलग दुसरा आठवडा हा चित्रपट हाऊसफुलची पाटी कायम राखून आहे. त्यामुळे सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्री अमृता खानविलकर आणि अभिनेता आदिनाथ कोठारे यांच्या अभिनयासह ‘चंद्रमुखी’च्या कथानकाची चर्चा आहे. शिवाय दिग्दर्शक प्रसाद ओक याने प्रत्येक भूमिका कलाकाराकडून साकारून घेताना घेतलेली मेहनत या चित्रपटातून दिसून येतेय. दरम्यान ज्याचे क्रेडिट त्याला मिळायलाच हवे आणि म्हणूनच लाडक्या चंद्राने दिग्दर्शकाची खास पोस्ट लिहिली. यावर प्रसादनेही भरभरून चंद्राचं कौतुक केलं आहे.

विश्वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’ या कादंबरीवर आधारित ‘चंद्रमुखी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिनेता आणि दिग्दर्शक प्रसाद ओक याने केले आहे. त्याची मेहनत हि चित्रपट गाजवीत असलेल्या थिएटरमध्ये स्पष्ट दिसून येत आहे. त्याने दिलेल्या भूमिकेसाठी आणि त्याने दिलेल्या प्रत्येक बारीक सारीक कलाकृतीसाठी अमृताने प्रसादचे आभार मानले आहेत. यासाठी तिने अधिकृत सोशल मीडियावर अतिशय सुंदर कमी शब्दात मात्र मनोवेधक अशी खास पोस्ट लिहीली आहे. “किती वर्णू ग महिमा त्याचा ….. ह्या एका वाक्यात सगळं आलं… कादंबरी देण्यापासून ते हे शेवटचं गाणं करण्यापर्यंत … तू जे जे केलंस त्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत ….. मला स्वतःशी ओळख करून देण्यासाठी मी आयुष्यभर तुझी ऋणी राहीन …. असे लिहत अमृताने एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ अमृताच्या सवाल जवाब गाण्याचा आहे. यामध्ये दोन व्हिडीओ मर्ज केले आहेत. एकात प्रसाद दिग्दर्शन करताना आणि एक फायनल व्हिडीओ. तीच्या या पोस्टवर प्रेक्षकांच्या भरभरून प्रतिक्रिया आल्या आहेतच शिवाय स्वतः प्रसाद आणि त्याची पत्नी मंजिरी यांनीही कमेंट केल्या आहेत.

यावर प्रतिक्रिया देताना अभिनेता आणि चंद्रमुखीचा दिग्दर्शक प्रसाद ओक याने लिहिले आहे कि, “गानं ऐकलंय तिचं, नाच पायलाय तिचा.. निस्ती चांगली न्हाय… त लैच भारी “कलावंतीन” हाय आमची “चंद्रा”. फकस्त नाचातच न्हाय तर अभिनयात बी लैच ताकदीची हाय आमची “चंद्रा”. आशीच ऱ्हा “चंद्रा” वानी. म्हंजी लोक जवा बी बघत्याल तवा मान ताठ करूनच बघत्याल तुज्याकडं..!!!! लै लै लै म्हंजी लैच पिरेम.” तर प्रसाद ओक याची पत्नी मंजिरी ओक हिने प्रतिक्रिया देताना लिहिले कि, अमुड्याआआआआ काटा आला अंगावर.. सगळ आठवून.. लव्ह यु.. तुझे भाव आणि अर्थातच तुझे समर्पण.. देव तुला भरभरून आशीर्वाद देवो!