Take a fresh look at your lifestyle.

‘सारखं काहीतरी होतंय’ म्हणत प्रशांत दामलेंनी उखाण्यातून सांगितलं नव्या नाटकाचं गुपित

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रसिद्ध मराठी अभिनेता प्रशांत दामले हे नेहमीच काही ना काही कारणामुळे चर्चेत असतात. कधी खवय्ये म्हणून तर कधी गवय्ये म्हणून. तर कधी एखाद्या मुद्द्यावर पारखं भाष्य करण्यासाठी प्रशांत दामले सोशल मीडियावर चर्चेत असतात. पण यावेळी त्यांच्यापेक्षा जास्त त्यांचे उखाणे चर्चेत आले आहे . व्हेलेंटाईन डे’चे औचित्य साधून प्रशांत दामले यांनी काही हटके उखाण्यांची जणू ऱ्हास लावली होती. एकामागे एक असे नऊ फोटो, नऊ प्रतिक्रिया आणि तब्बल नऊ उखाणे शेअर केले होते. पण हा उखाण्यांचा तर नुसता बहाणा होता. याच्या माध्यमातून त्यांनी आपल्या आगामी नव्या नाटकाबद्दल सांगण्याचा घाट घातला होता.

प्रसिद्ध मराठी अभिनेता प्रशांत दामले आणि प्रसिद्ध मराठी अभिनेत्री वर्षा उसगांवकर रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज झाले आहेत. एका नव्या कोऱ्या धमाल विनोदी नाटकाच्या माध्यमातून ते तब्बल ३६ वर्षानंतर पुन्हा एकदा रंगमंचावर एकत्र दिसणार आहेत. त्यांच्या या नव्या कोऱ्या धम्माल विनोदी नाटकाचे नाव आहे ‘सारखं काहीतरी होतंय’. या नाटकाचा जॉनर कॉमेडी असल्यामुळे प्रेक्षकवर्ग अगदी धम्माल आणि मजा करू शकणार आहे. खूप दिवसांनी काहीतरी भारी आणि भन्नाट पहायला मिळणार म्हणून सगळेच खुश झाले आहे.

मुख्य म्हणजे या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन मराठी अभिनेता संकर्षण कऱ्हाडे याने केले आहे. संकर्षण एक उत्तम अभिनेता, लेखक, कवी आणि सूत्रसंचालक देखील आहे. एकीकडे प्रशांत दामले यांचे उखाण्याचे पोस्टर व्हायरल झाले आहेत. तर दुसरीकडे प्रशांत दामले, वर्षा उसगांवकर आणि संकर्षणचा टिझर व्हिडीओ देखील धुमाकूळ घालतोय. त्यामुळे एकंदरच मनोरंजनाची बहारदार पर्वणी प्रेक्षकांसाठी येण्यास सज्ज आहे यात काही वादच नाही. काय मग तुम्हीपण तयार आहेत ‘सारखं काहीतरी होतंय’ अनुभवायला. बहारदार प्रेम, धम्माल विनोद, थोडे अल्लड थोडे बालिश पण कमाल शब्दरचनेचा संच म्हणजे ‘सारखं काहीतरी होतंय’.