Take a fresh look at your lifestyle.

‘धर्मवीर’ मुक्काम पोस्ट ठाणे; प्रवीण तरडेंच्या आगामी चित्रपटात दिसणार आनंद दिघेंची चरित्रगाथा

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। एक हाडाचा शेतकरी, एक उत्तम अभिनेता, एक हरहुन्नरी लेखक, एक यशस्वी दीघर्षक अशी ख्याती असलेले प्रवीण विठ्ठल तरडे यांचा चाहता वर्ग फार मोठा आहे. प्रवीण तरडे नेहमीच आपल्या लेखणीतून उत्तम दर्जाचे संवाद आणि आपल्या कल्पनेतून उत्तम दर्जाचे चित्रपट आपल्या चाहत्यांसाठी घेऊन येत असतात. त्यांचा प्रत्येक चित्रपट एक प्रतिभावान कलाकृती असते. मुळशी पॅटर्न सारखा ज्वलंत वास्तवदर्शी चित्रपट आणि देऊळ बंद सारखा भावनेशी नाळ जोडलेला चित्रपट त्यांनी प्रेक्षकांसाठी प्रस्तुत केला होता. यानंतर आता ठाण्याचा ढाण्या वाघ धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनपटावर आधारित चित्रपट प्रवीण तरडे घेऊन येत आहेत.

अभिनेते, लेखक व दिग्दर्शक ‘प्रविण विठ्ठल तरडे’ हे आपल्या आगामी ‘धर्मवीर’ या चित्रपटातून कट्टर शिवसैनिक आणि ठाण्याचा ढाण्या वाघ अशी ओळख असणार्‍या ‘आनंद दिघे’ यांचा जीवनपट मोठ्या रुपेरी पडद्यावर दाखवणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती निर्माता मंगेश देसाई करणार आहेत. याबाबतची माहिती नुकतीच प्रवीण तरडे यांनी दिली आहे. प्रवीण तरडे यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर ‘धर्मवीर’ या चित्रपटाचा फर्स्ट लूक अर्थात चित्रपटाचा टिझर प्रदर्शित केला आहे. या टीझरला सर्व स्तरांतून विशेष पसंती मिळत आहे. तर या चित्रपटात काय असणार याबाबत अनेकांची उत्सुकता शिगेला लागली आहे.

 

एक आदरयुक्त धाक, थरकाप भरवणारा दरारा, समोरच्या व्यक्तीच्या उरात धडकी भरवणारी तिक्ष्ण नजर, अन्याय करणाऱ्याच्या पाठीवर आसूड ओढणारे ठाण्याचा वाघ आणि शिवसेनेचा कट्टर समर्थक अशी ख्याती असलेल्या धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनाचे भाष्य करीत एक अनोखे पर्व उलगडणारा एक भव्य चित्रपटात लवकरच प्रेक्षकांसाठी मोठ्या पडद्यावर येणार आहे. ‘धर्मवीर – मुक्कामपोस्ट ठाणे’ असं या चित्रपटाचे शीर्षक आहे. या चित्रपटातून आनंद दिघे यांच्या आठवणींना उजाळा दिला जाणार असल्याने समर्थकांमध्ये मोठी चर्चा आहे.