हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री इलियाना डिक्रूझ लग्नाआधीच प्रेग्नेंट असल्यामुळे सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. तिने सोशल मीडिया हँडलच्या माध्यमातूनच आपल्या प्रेग्नेंसीची माहिती दिली होती. यानंतर तिच्या चाहत्यांनी वारंवार या बाळाचे वडील कोण आहेत..? असा सवाल उठवला आहे. मात्र याबाबत तिने एकदाही कोणतेच विधान केलेले नाही. पण नुकतीच तिने इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर केली आहे. ज्यामध्ये इलियानाने होणाऱ्या बाळाच्या वडिलांची झलक दाखवली आहे.
काही दिवसांपूर्वीच इलियानाने सोशल मीडियावर बेबी बंप शेअर केलेहोते . तिचे ते फोटो प्रचंड व्हायरल झाले होते. यानंतर आता इलियाना होणाऱ्या बाळाच्या बाबांसोबत बेबीमूनसाठी देशाबाहेर गेली आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा एक बूमरँग व्हिडिओ आहे. ज्यामध्ये इलियानाने तिच्या बेबीमून डायरीची पहिली झलक दाखवली आहे. ती कुठे गेली आहे हे अद्याप सांगता येणार नाही मात्र या क्लिपवरून ती परदेशात गेली असल्याचं दिसत आहे.
हि स्टोरी शेअर करताना अभिनेत्री इलियाना डिक्रुझने लिहिले आहे कि, ‘बेबीमून’. ‘बेबीमून’च्या पहिल्या व्हिडीओ क्लिपमध्ये तिने समुद्र किनाऱ्याची झलक शेअर केली आहे. तर दुसऱ्या क्लिपमध्ये ड्रिंक्सचे ग्लास दाखवले आहेत.
तसेच तिसर्या क्लिपमध्ये इलियाना आणि तिच्या पार्टनरचा हात दिसत आहे. मात्र नुसत्या हातावरून हि व्यक्ती कोण आहे हे सांगणे फारच कठीण आहे. इलियानाने तिच्या बाळाच्या बाबांची ओळख दडवून ठेवली आहे. तिने बऱ्याच काळापासून याबाबत मौन बाळगलं आहे.
Discussion about this post