Take a fresh look at your lifestyle.

प्रियांका चा निक सोबतचा हा व्हिडिओ व्हायरल

0

मुंबई | प्रियंका चोपडा आपला जास्तीत जास्त वेळ पती निक सोबत घालवत असते. ते दोघे नेहमी प्रत्येक इव्हेंट मध्ये किंवा डेट वर सोबत असतात. नुकताच प्रियंका आणि निकचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये प्रियंका, जोनस ब्रदरच गाणं ‘सकर’ गातांना दिसते आहे. हा कराओके नाइटचा व्हिडीओ आहे.

व्हिडीओमध्ये प्रियंका, निकसोबत डान्स करतांना दिसते आहे. प्रियंकाने ब्लॅक आणि व्हाईट कलरचा वनपीस घातला आहे. प्रियंका आणि निकचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होतो आहे. या व्हिडीओला चाहत्यांची पसंती मिळाली आहे. काहींनी प्रियंका आणि निकच्या ड्रेसवर त्यांना ट्रोल केले.

प्रियंकाला ट्रोलर्सच्या बोलण्याचा काही फरक पडत नाही. निक आणि प्रियंका काही दिवसांपूर्वीच इटली मध्ये होते. इटली मध्ये असतांनाचा त्यांचा एक व्हिडीओ समोर आला होता त्या व्हिडीओ मध्ये ते दोघे पास्ता बनवतांना दिसत होते.

Leave A Reply

Your email address will not be published.