Take a fresh look at your lifestyle.

‘पंतप्रधान मोदी 2024 मध्ये होणार क्लीन बोल्ड’; KRKने ट्विटमधून केली भविष्यवाणी

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता आणि स्वयंघोषित समीक्षक कमाल राशिद खान अर्थात KRK सध्या सोशल मिडियावर त्याच्या अनेक विधानांमुळे चांगलाच चर्चेत आणि त्याचसोबत तिखट वादांमध्ये समाविष्ट असल्याचे दिसत आहे. विविध कलाकारांच्या बाबतीत काही ना काही वादग्रस्त विधाने करून KRK गेल्या काही दिवसांमध्ये अचानकच प्रकाश झोतात आल्याचे दिसत आहे. यात प्रामुख्याने KRK चा बॉलिवूड प्रसिद्ध अभिनेता सलमान खानसोबत पेटलेला वाद सोशल मीडियावर गोसपीचा विषय झाला होता. यानंतर आता मोठं गॉसिप पुन्हा रंगलंय ते KRK ने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या ट्विटमुळे.

KRKने नुकतेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात एक ट्विट केले आहे. त्याने पंतप्रधान मोदी आणि २०२४मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकां संदर्भात हे ट्विट लिहिलेले आहे. KRKने आपल्या ट्विटमध्ये लिहिले कि, ‘माझा आजचा अंदाज – पीएम मोदी जी २०२४ मध्ये क्लीन बोल्ड आउट होतील’.

KRKचे हे ट्विट सध्या सोशल मिडियावर चांगलेच वायरल होत आहे. इतकेच काय तर त्याचे हे ट्विट पाहून नेटकरी अश्या अश्या प्रतिक्रिया देत आहेत कि बस रे बस. त्याच्या या ट्विटवर काही सोशल मिडिया यूझर्स सहमती दर्शवत आहेत, तर काही त्याला ट्रोल करताना दिसत आहेत.काही युजर्स तर संतप्त प्रतिक्रिया देतानाही दिसत आहेत.

 

मुख्य म्हणजे KRK कधी नव्हे तितका आता प्रकाश झोतात येऊ लागला आज आणि याचे कारण म्हणजे सलमान खान आणि मिका सिंग सोबत पेटलेला वाद. सलमानसोबत वाद इतका विकोपाला गेला होता कि त्याच्यावर मानहानीची केस देखील दाखल झाली. दरम्यान KRKने दावा केला होता की, सलमानने ‘राधे’ चित्रपटाच्या निगेटिव्ह रिव्यूसाठी त्यावर मानहानीचा गुन्हा दाखल केला. मात्र सलमानच्या वकिलाने सांगितले, KRK जे कारण सांगत आहे ते चुकीचे आहे. मुळात KRKने सलमानला बदनाम करण्यासाठी विविध आरोप केले आहेत, यात तो भ्रष्ट असल्याचे म्हटले आहे आणि त्याची संस्था बीइंग ह्यूमनवर फसवणुक व पैशांची अफरातफर केल्याचा आरोप केल्याने त्याच्यावर मानहानीचा गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय मीकानेही KRKवर KRKकुत्ता – बार्किंग डॉग असे एक गाणे तयार करून त्याच्यावर चांगलीच धाडस काढली आहे.