Take a fresh look at your lifestyle.

तुमची मते लादू नका; वेबसीरिजमधील बोल्ड सीनमुळे ट्रोल करणाऱ्यांना प्रिया बापटचे पलट उत्तर

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन चित्रपटसृष्टीतील आघाडीवर असलेली अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री प्रिया बापट हिची ‘सिटी ऑफ ड्रिम्स २’ हि वेबसीरिज अलीकडेच प्रदर्शित झाली आहे. या वेबसिरीजचा पहिला भागही प्रेक्षकांना अत्यंत आवडला होता आणि याही भागाला प्रेक्षक तितकाच उदंड प्रतिसाद देत आहेत. यात प्रियाने पूर्णिमा गायकवाडची भूमिका साकारली आहे. जी आधी गृहिणी असते आणि मग राजकारणात एन्ट्री करायचे ठरवते आणि आता तर चक्क मुख्यमंत्री पदाच्या सत्तेसाठी वडिलांविरोधात लढताना दिसते. पहिल्या भागात प्रियाने बोल्ड सीन दिले असताना तिला सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल केले होते. त्यामुळे आता प्रिया खूप क्लीअर आहे आणि तिला ट्रॉलिंगचा फरक पडत नाही असे तिने स्पष्ट केले आहे.

या संदर्भात बोलताना अभिनेत्री प्रिया बापट म्हणते की, मी तेव्हादेखील म्हटले होते की ते सीन त्या गोष्टीचा भाग आहे आणि तिच्या अस्तित्वाचा भाग आहे. तिच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे ते फँटसी एलिमेंटने आलेले नाही. जर त्या स्क्रिप्टची आणि भूमिकेची गरज असेल तर मी असे सीन करेन. तसेच मला त्यावेळी कोणतीही गोष्ट आक्षेपार्ह वाटत नसेल तर माझी असे सीन द्यायला काहीही हरकत नाही. ट्रोलिंगचा बोलायचे झाले तर जेव्हा सुरूवातीला १ मिनिटांची क्लिप पाहून लोक टीका करत होते. जेव्हा सीझन लोकांनी पाहिला तेव्हा त्या सीनचे महत्त्व कळले. एक मिनिटांची क्लीप किंवा इंटिमेट सीन हेच तिचे व्यक्तिमत्त्व नाही. त्याहीपेक्षा पलिकडे जाऊन ते पात्र आहे. जेव्हा तुम्ही पात्र स्वीकारता तेव्हा मला नाही वाटत कोणाला प्रॉब्लेम असेल आणि असला तरी तो त्या कामाचा भाग आहे. त्यामुळे मी ट्रोलर्सकडे फार लक्ष देत नाही. मला दोन वर्षांपूर्वी पहिले काही दिवस खूप त्रास झाला होता. मात्र आता मला काहीही फरक पडत नाही.

पुढे. मला असे वाटते की ट्रोलर्सना फक्त बोलायचे असते किंवा लक्ष वेधून घ्यायचे असते म्हणून ते असे करतात. ज्यांना खरंच सीझन आणि पात्रामध्ये इंटरेस्ट असतो ते संपूर्ण सीझन पाहतात आणि मग मी त्यांचे कोणतेही मत असेल तर ते गृहित धरते किंवा समजून घेते. शेवटी कला ही व्यक्तिनिष्ठ आहे.आवड निवड ही व्यक्तीवर अवलंबून आहे. एखादी गोष्ट मला पटली म्हणजे तुला पण पटेल असे नाही होत. तुला नाही पटत आहे ते मी आदरयुक्त स्वीकारेन. पण किमान तुमची मते दुसऱ्यावर लादू नका, असे म्हणत प्रिया बापटने आपली बाजू अगदी स्पष्टपणे मांडली आहे.