Take a fresh look at your lifestyle.

देसी गर्लने दिली गुडन्यूज; सरोगसीद्वारे जोनास कुटुंबात बाळाच्या पावलाने आला आनंद

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये देसी गर्ल म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री प्रियंका चोप्रा लग्नानंतरची जोनास हिने गुडन्यूज दिली आहे. होय होय गुडन्यूज जाणीव अगदी तुम्ही समजताय तीच. प्रियंका आणि निक यांच्या घरी चिमुकल्या बाळाचं आगमन झालं आहे. प्रियंकाने स्वत:च्या अधिकृत सोशल मीडिया इंस्टाग्राम हँडलवर हि बातमी शेअर केली आहे. तीने सरोगसीद्वारे आपल्या घरी बाळाचे स्वागत केले आहे. यानंतर सोशल मीडियावर आनंदाची लाट उसळली आहे. तिचे चाहते तिला शुभेच्छा येत बाळाचे स्वागत करत आहेत.

प्रियांका जोपरा जोनासने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर चाहत्यांसोबत हि आनंदाची बातमी शेअर केली आहे. या पोस्टमध्ये प्रियानकाने लिहिले कि, आम्ही सरोगसीद्वारे बाळाचे स्वागत केले आहे. याबाबतची बातमी देताना आम्हाला खूप आनंद होतोय. या आनंदाच्या आणि विशेष क्षणात आम्ही आमच्या कुटुंबावर लक्ष केंद्रीत करत आहोत. धन्यवाद. विशेष सांगायची बाब म्हणजे याआधी अनेकदा प्रियांका आणि निक या दोघांनाही त्यांच्या कुटुंबाविषयी विचारण्यात आले होते. कित्येकदा बाळाचा विचार कधी करणार असे प्रश्न येऊनही त्यांनी कधी यावर विशेष प्रतिक्रिया दिली नाही. मात्र आपल्यासाठी आपल्या आयुष्यात आणि कुटुंबात बाळ फार स्पेशल बाब आहे असे एकदा निकने सांगितले होते.

याशिवाय प्रियंकाने एका मुलाखतीदरम्यान आई होण्याची इच्छा व्यक्ती केली होती. ‘व्हॅनिटी फेअर’ या प्रसिद्ध मॅगेझिनला देताना प्रियांकाने आपलं काम, फॅमिली आणि फॅमिली प्लॅनिंगबाबत मोकळेपणानं माहिती दिली होती. आई होणं हे टू-डू लिस्टमध्ये आहे का? असा प्रश्न विचारल्यावर ती म्हणाली होती कि, ‘स्वत: चं घर खरेदी करणं आणि आई होणं या दोन्ही गोष्टी कायम प्रायोरिटीवर आहेत. सध्या निक आणि मी आपापल्या कामात व्यस्त आहोत. अद्याप अशा अनेक गोष्टी आहेत ज्या मी केलेल्या नाहीत. त्या करण्याची माझी इच्छा आहे. तसं पाहिल्यास आम्ही इतकेही बिझी नाहीत. आम्ही आत्ताही बेबी प्लॅन करू शकतो. मात्र, कामाच्या गोंधळात मला फॅमिलीपासून दूर राहणं आवडणार नाही. म्हणून आम्ही विचारपूर्वक बेबी प्लॅनिंग केलेलं आहे. भविष्यात मला आई होणं नक्कीच आवडेल पण, आम्हाला सध्या घाई करायची नाही’.

प्रियांका- निक यांनी १ डिसेंबर २०१८ रोजी लग्न केले. प्रियांकाचा पती निक जोनास हा अमेरिकेतला प्रसिद्ध गायक आहे. मात्र प्रियांका देसी गर्ल असल्यामुळे तिचे भारतीय चाहत्यांसोबत वेगळे असे भावनिक नटे आहे. पॉप स्टार निक जोनास आणि अभिनेत्री प्रियांका चोप्रा हे बॉलिवूड आणि हॉलिवूडमधील सर्वांत लोकप्रिय आणि चर्चेत असणारे कपल आहे.