Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

चिमुकल्या मालतीसोबत देसी गर्ल झळकली ‘British Vogue’ मासिकाच्या कव्हर पेजवर; पहा फोटो

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
January 20, 2023
in Hot News, Trending, गरम मसाला, फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
Priyanka Chopra
0
SHARES
51
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडची पिग्गी चॉप्स अर्थात प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्रा फक्त बॉलिवूड सिनेविश्वात नव्हे तर हॉलिवूडमध्येही चांगलीच लोकप्रिय ठरली आहे. संपूर्ण जगभरात तिने स्वतःची अशी एक विशेष ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे प्रियांकाला ‘ग्लोबल स्टार’देखील म्हटले जाते. अशा या अभिनेत्रीने आणखी एक सन्मान मिळवत भारताचा शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

View this post on Instagram

A post shared by British Vogue (@britishvogue)

प्रियांका ही एकमेव अशी भारतीय अभिनेत्री आहे जी ४० पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय मासिकांवर झळकली आहे. यात आता ‘ब्रिटिश वोग’ मासिकाचाही समावेश झाला आहे. या मासिकाच्या कव्हरपेजवर झळकणारी प्रियांका हि पहिली भारतीय अभिनेत्री ठरली आहे.

View this post on Instagram

A post shared by British Vogue (@britishvogue)

‘ब्रिटिश वोग’ या मासिकाच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर प्रियांकाचे काही फोटो आपण पाहू शकतो. या फोटोमध्ये अभिनेत्री प्रियांका चोप्रा अतिशय क्लासी अंदाजात दिसते आहे. यामध्ये तिने पिवळ्या कलरचं जॅकेट परिधान केलं आहे. सोबतच मोकळे केस आणि किलर लूकसह ती लक्ष वेधून घेत आहे. प्रियांकाच्या या जबरदस्त लूकने सोशल मीडियावरील नेटकऱ्यांना आकर्षित केले आहे. याशिवाय ब्रिटिश वोगच्या इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या फोटोंपैकी एका फोटोमध्ये प्रियांका तिच्या मुलीसोबत पोज देताना दिसतेय.

View this post on Instagram

A post shared by British Vogue (@britishvogue)

अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर, प्रियांका एक यशस्वी अभिनेत्री आहे. तिने बॉलिवूडसह हॉलीवूडमध्येही अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. सध्या तिचा ‘इट्स ऑल कमिंग बॅक टू मी’ हा चित्रपट आणि ‘सिटाडेल’ हि वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

View this post on Instagram

A post shared by British Vogue (@britishvogue)

‘सिटाडेल’ या सीरिजमध्ये ‘गेम ऑफ थ्रोन्स’मधील अभिनेता रिचर्ड मॅडनसोबत प्रियांका दिसणार आहे. तर ‘इट्स ऑल कमिंग बॅक टू मी’ हा चित्रपट येत्या १० फेब्रुवारी २०२३ रोजी रिलीज होणार आहे. याशिवाय फरहान अख्तरच्या ‘जी ले जरा’ या चित्रपटामध्ये देखील प्रियांका मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात प्रियांकासह आलिया भट्ट आणि कॅटरिना कैफदेखील अन्य मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

Tags: Bollywood ActressInstagram PostPriyanka ChopraViral Photos
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group