Take a fresh look at your lifestyle.

३ कॉकटेल पिऊन टल्ली झाली प्रियांका चोप्रा; इतके सांगून फ्लाईट अटेंडंटने व्हिडीओ केला डिलीट

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेत्री प्रियंका चोप्राने बॉलिवूड सोबत हॉलिवूडदेखील चांगलेच गाजविले आहे. हॉलिवूडमध्ये देखील तिचे स्वतःचे असे वेगळे स्थान निर्माण केले आहे. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांचे विविध किस्से चर्चेत येत असतात. तसाच प्रियंका चोप्राचा एक जुना किस्सा चांगलाच प्रसिद्ध असून याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. प्रियांका फ्लाईटमधून प्रवास करत असताना कॉकटेल पिऊन टल्ली झाल्याचा व्हिडीओ अत्यंत चर्चेत आला होता. हा व्हिडीओ फ्लाईट अटेंडंटने शेअर केला होता. मात्र काही वेळाने हा व्हिडीओ तिने डिलिट केल्याचे दिसून आले.

अभिनेत्री प्रियांका चोप्राचे निक जोनास सोबत लग्नझाल्यानंतर ती खूपच चर्चेत येऊ लागली. मात्र महत्वाचे हे कि ती नेहमीच तिच्या आगळ्या वेगळ्या ड्रेसींग आणि युनिक स्टाइलमुळे जास्त चर्चेत राहिली आहे. पण बऱ्याच दिवसांपूर्वी प्रियंका क्वाँटिको या मालिकेमुळे बहुचर्चित झाली होती. हा किस्सा साधारण त्याच दरम्यानचा आहे. तेव्हा प्रियांकाचे निक जोनास सोबत लग्न देखील झालेले नव्हते. एका फ्लाइट अटेंडंटनी रेडइट वेबसाइटवर तिचा व्हिडिओ अपलोड केला होता. पण काहीच काळात हा व्हिडीओ सोशल मीडियावरून डीलिट करण्यात आला. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर उपलब्ध नसला तरी हा किस्सा लोकांच्या चांगलाच लक्षात आहे.

फ्लाईट अटेंडंटने या व्हिडिओत सांगितले होते की, प्रियांका प्रवास करत असताना मी त्या विमानात अटेंडेट होती. तिने मला बोलावलं आणि ब्लॅक मेरी हे कॉकटेल मागवलं. त्यासोबत हॉट सॉस पण तिने मागवले होते. प्रियांका तीन कॉकटेल प्यायली. हे प्यायल्यानंतर ती चांगलीच टल्ली झाली होती. त्यानंतर प्रियांका कुणाशीच काहीच बोलली नाही आणि झोपून गेली.

अभिनेत्री प्रियंका चोप्रा सध्या खूप चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी ती ‘अनफिनिश्ड’ या तिच्या पुस्तकामुळे चर्चेत आली होती. त्यानंतर अमेरिकन टीव्ही प्रेझेंटर ओपेरा विन्फ्रेला दिलेल्या मुलाखतीनंतर ती सोशल मीडियावर खूप चर्चेत आली होती. एका बोल्ड ड्रेसमुळे नुकतीच तिची चर्चा सोशल मीडियात रंगली होती. प्रियंका चोप्राच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर शेवटची ती ‘द व्हाइट टाइगर’ चित्रपटात दिसली होती. रमिन बहारानी दिग्दर्शित या चित्रपटात प्रियंकासोबत आदर्श गौरव आणि राजकुमार राव मुख्य भूमिकेत होते.