Take a fresh look at your lifestyle.

प्रियांकाच्या ‘या’ ड्रेसची किंमत माहित आहे का?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अभिनेत्री प्रियांका चोप्रा बऱ्याच वेळा तिच्या फॅशनसेन्समुळे चर्चेत येत असते.  बऱ्याचदा तिला ट्रोलही व्हावं लागतं. मात्र ट्रोलर्सकडे दुर्लक्ष करुन प्रियांका तिची आवड जपत असते. यामध्येच सध्या प्रियांकाच्या एका डेनिम फ्रॉकची चर्चा चाहत्यांमध्ये रंगली आहे. या ड्रेसची किंमत सध्या चाहत्यांमध्ये चर्चिली जात  आहे.

प्रियांकाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने डेनिमचा एक ड्रेस परिधान केला आहे. हा ड्रेस अत्यंत साधा दिसत असून त्याची किंमतदेखील तशीच आहे. अनेक वेळा सेलिब्रिटी म्हटल्यावर त्यांचे महागडे कपडे चर्चेत असतात. परंतु, प्रियांकाचा हा ड्रेस अत्यंत साधा आणि कमी किंमतीचा आहे.

प्रियांकाचा हा डेनिम फ्रॉक शॉर्ट लेंथचा असून त्याला स्क्वेअर नेकलाइन आहे. तर फूल स्लिव्ह आहेत. त्यामुळे हा ड्रेस अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे. परंतु, प्रियांकाच्या स्टारडमनुसार या ड्रेसची किंमत कमी आहे. हा ड्रेस केवळ ९ हजार ५९१ रुपयांचा आहे. त्यामुळे अनेकांचं लक्ष प्रियांकाकडे वेधलं आहे.

Comments are closed.