Take a fresh look at your lifestyle.

कतरिना कैफने केले आलिया आणि प्रियांकासाठी खास मेजवानीचे आयोजन

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन । अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि आलिया भट्ट यांनी नुकतेच कतरिना कैफ हिच्या घरी हजेरी लावली.प्रियांका एका खास कार्यक्रमासाठी भारतात आली होती. तो कार्यक्रम आटोपल्यानंतर आज ती पुन्हा लॉस एन्जेलिससाठी रवाना झाली.

कतरिनाच्या घरी जाताना प्रियांकाने पांढऱ्या रंगाच्या ड्रेस घातला होता तर आलियाने करड्या रंगाचा टीशर्टला पसंती दिली होती. याआधीही कतरिना आणि आलियाने एकमेकांसोबतचे आपले अनेक फोटो शेअर केले आहेत. पण जेव्हापासून आलिया रणबीरला डेट करू लागली तेव्हापासून दोघींचे एकमेकांसोबतचे फोटो फार कमी होऊ लागले.


View this post on Instagram

#aliabhatt snapped #viralbhayani @viralbhayani

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on Feb 23, 2020 at 5:37am PST

 

यानंतर मात्र दोघींनीही एकमेकांशी असलेला संपर्क थोडा कमी केला. कतरिना आणि रणबीर हे दोघे अनेक वर्ष लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. पण फिल्मफेअर पुरस्कारांदरम्यान कतरिनाने हे स्पष्ट केलं की, जेव्हा यावर मी विचार केला तेव्हा कळलं की, माझं आणि आलियाचं नातं त्या नात्याहून पूर्ण वेगळं आहे जे रणबीर आणि मी शेअर करायचो. ब्रेकअपनंतर मी आलियासोबतचं असलेलं माझं नातं का बदलू ते पण अशा व्यक्तिसाठी ज्याला मी आधी डेट करत होते.


View this post on Instagram

#priyankachopra #anjinidhawan #jacquelinefernandez snapped #viralbhayani @viralbhayani

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on Feb 23, 2020 at 5:36am PST

 

याशिवाय कतरिनाने नुकताच ग्रॅमी पुरस्कारांवेळी प्रियांकाने घातलेल्या ड्रेसवरही आपली प्रतिक्रिया दिली. याबद्दल बोलताना कतरिना म्हणाली की, मला माहीत नाही कि,प्रियांकाच्या ड्रेसवरून नेमक्या कोणत्या चर्चा होत आहेत आणि मला हेही माहीत नाही की लोक तिच्याबद्दल काय बोलत आहेत. मला फक्त एवढंच माहीत आहे की प्रियांका त्या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत होती. मला नाही वाटत तिच्या ड्रेसला कोणी योग्य पद्धतीने पाहिलं आहे नाहीतर अशा चर्चा झाल्या नसत्या.

 

Comments are closed.

%d bloggers like this: