Take a fresh look at your lifestyle.

प्रियांका चोप्राच्या ‘द व्हाईट टायगर’ चा ट्रेलर प्रदर्शित

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | बॉलीवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा लवकरच राजकुमार रावसोबत ‘द व्हाईट टायगर’या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झालाय. सोशल मीडियावर या ट्रेलरनेअक्षरशः धुमाकूळ घातला आहे. प्रियंकाने चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला. ट्रेलरमध्ये राजकुमार व प्रियंका एनआरआय कपलच्या रूपात आहेत आणि आदर्श गौरव त्यांच्या ड्रायव्हरच्या भूमिकेत आहेत.

प्रियंका व राजकुमार यांच्याशिवाय प्रत्येक सीनमध्ये आदर्श गौरवने धमाकेदार परफॉर्मन्स दिला आहे.प्रियंकाने यात पिंकी नामक व्यक्तिरेखा साकारली आहे तर राजकुमारने अशोक नावाचे पात्र जिवंत केले आहे. आदर्श गौरव बलराम नामक ड्रायव्हरची भूमिका साकारली आहे. ड्रायव्हर बलरामला श्रीमंत व्हायचे असते. आधी तो यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करतो. मात्र एका वळणावर लवकरात लवकर पैसा कमवण्याच्या नादात तो चुकीच्या मागार्ला लागतो आणि या चित्रपटाची संपूर्ण कथा वेगळ्या वळणावर जाते.

‘द व्हाईट टायगर’ हा सिनेमा अरविंद अडिगा यांच्या ‘द व्हाईट टायगर’ या पुस्तकावर आधारित आहे. रमिन बहरानी हा सिनेमा दिग्दर्शित करत आहेत.नेटफ्लिक्स मुकूल देवरा यांच्यासोबत मिळून हा सिनेमा दिग्दर्शित करत आहे. प्रियंकाही एक्झिक्युटिव्ह प्रोड्यूसर म्हणून या सिनेमाशी जुळलेली आहे. गेल्यावर्षीच या सिनेमाचे शूटींग पूर्ण झाले होते. शूटींगच्या अखेरच्या दिवसाचा फोटोही प्रियंकाने शेअर केला होता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Comments are closed.