Take a fresh look at your lifestyle.

प्रियांका- निकच्या लेकीचे देसी परदेसी नाव चर्चेत; जाणून घ्या नाव आणि नावाचा अर्थ

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड जगतात आपली विशेष ओळख निर्माण करून जिने हॉलिवुडलाही वेड लावलं अशी अभिनेत्री प्रियांका चोप्रा- जोनास हि नेहमीच चर्चेत असते. त्यात ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्यामुळे तिचे चाहते नेहमीच तिच्या संपर्कात असल्याचे दिसून येते. प्रियांकाने निक जोनासह लग्न केल्यानंतर देश सोडला असला तरी तिच्यामध्ये देसीपंती कायम आहे. या २०२२ च्या सुरुवातीलाच प्रियांकाने तिच्या चाहत्यांना गुड न्यूज देत सांगितले कि, ती आई झाली आहे. तिचे चाहते तिच्या बाळाला पाहण्यास अतिशय उत्सुक असून त्याचे नाव काय याबाबतही अनेकदा त्यांनी विचारणा केल्याचे दिसून आले. प्रियांका एका गोड मुलीची आई झाली असून आता तिच्या लेकीचे नाव सर्वांसमोर उघड झाले आहे.

प्रियांका चोप्रा आणि निक जोनास या दांपत्याने सरोगसीच्या मदतीने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. यानंतर अजूनही त्यांनी आपल्या लेकीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केलेला नाही. इतकेच नव्हे तर आपल्या बाळाला मीडियासमोरदेखील आणलेले नाही. मात्र आता त्यांच्या लेकीचे नाव तेव्हढे उघड झाले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अभिनेत्री प्रियांका चोप्रा- जोनासने खूप विचार करून आपल्या मुलीचे अर्थपूर्ण नाव ठेवले आहे. त्यांनी आपल्या मुलीचं नाव मालती मेरी चोप्रा जोनास असं ठेवले असल्याची चर्चा आहे. एका वृत्त वाहिनीने सांगितल्याप्रमाणे, प्रियांकाच्या मुलीचं जन्म प्रमाणपत्र मिळाले असून त्यानुसार प्रियांका- निकच्या मुलीचा जन्म कॅलिफोर्नियामध्ये जानेवारी महिन्यात झाला आहे. तसेच तिचे नाव मालती मेरी चोप्रा जोनास असे आहे.

आता प्रियांका – निक यांच्या मुलीच्या नावाचा खुलासा झाल्यामुळे कदाचित आता त्यांच्या बाळाची झलक पहायला मिळेल. मात्र अद्याप प्रियांका आणि निक यांच्याकडून मुलीच्या नावाची पुष्टी केलेली नाही. मात्र प्रियांकाने आपल्या मुलीचं नाव ठेवताना दोन्ही संस्कृतींचा विचार केला आहे अशी चर्चा आहे. बाळाच्या नावातील मालती हे संस्कृतमधून घेण्यात आलेले भारतीय नाव आहे. ज्याचा अर्थ आहे ‘लहान सुगंधित फुल’ तर मेरी हे नाव लॅटिन भाषेतील स्टेला मॅरीसमधून घेण्यात आले आहे. ज्याचा मूळ अर्थ समुद्राचा तारा असा आहे. बाकी चोप्रा आणि जोनास हि बाळाला आई आणि वडिलांकडून मिळालेली आडनावे आहेत. सध्या या नावाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.