Take a fresh look at your lifestyle.

विजय देवरकोंडाच्या बहुप्रतीक्षित ‘Liger’ चित्रपटाविषयी निर्मात्यांनी केल्या महत्वाच्या घोषणा

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडा आणि बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे यांचा लायगर हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची घोषणा केल्यापासूनच चाहत्यांमध्ये उत्सुकतेचे वातावरण दिसून आले आहे. याचे कारण म्हणजे जगातील महान बॉक्सर माइक टायसनचीदेखील या चित्रपटात खास भूमिका आहे. यानंतर आता लायगर चित्रपटाच्या निर्मात्यांनी नवीन वर्षाच्या आधीच २९ डिसेंबर २०२१ रोजी चित्रपटाशी संबंधित माध्यमांना माहिती दिली.

आज २९ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी १०.३० वाजता निर्मात्यांनी लायगरबाबत माध्यमांना माहिती देताना एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ अत्यंत लक्षवेधक असून प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारा आहे. निर्मात्यांनी सांगितले कि, ३० डिसेंबर २०२१ रोजी सकाळी १०.०३ वाजता BTS स्टील रिलीज होईल. यानंतर संध्याकाळी ०४.०० वाजता खास इंस्टा फिल्टर रिलीज होतील. यानंतर ३१ डिसेंबर २०२१ रोजी फर्स्ट लूक रिलीज होईल. लायगर चित्रपटाची घोषणा फेब्रुवारी २०२१ मध्ये निर्माता करण जोहरने केली होती. यानंतर कोरोना महामारीमुळे या चित्रपटाचे शूट आणि पुढील बाबी रखडल्या. यानंतर अखेर हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल अशी आशा आहे.

लायगर चित्रपटात दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडा मुख्य नायक म्हणून एका बॉक्सरच्या भूमिकेत दिसेल. तर बॉलिवूड अभिनेता चंकी पांडे यांची मुलगी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनन्य पांडे या चित्रपटात मुख्य नायिका म्हणून विजयसोबत स्क्रीन शेअर करेल. तर जगप्रसिद्ध बॉक्सर माईक टायसनदेखील या चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. शिवाय रम्या कृष्णन, रोनित रॉय, विष्णू रेड्डी महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन पुरी जगन्नाथ यांनी केले आहे. तर निर्माता करण जोहर आणि अपूर्व मेहता यांनी एकत्र लायगरची निर्मिती केली आहे. हा चित्रपट हिंदी, तेलुगू, तामिळ, कन्नड आणि मल्याळम या ५ भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.