Take a fresh look at your lifestyle.

गायक हिमेश रेशमियांनी दिले वचन; किशोर दा आणि लता दीदींचे रिलीज न झालेले गाणे करणार रिलीज

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनू टीव्ही वरील प्रसिद्ध सिंगिंग शो इंडियन आयडॉल १२ मधील आगामी विकेंड अगदीच बहारदार असणार आहे. कारण हा विकेंड किशोर कुमार १०० सॉंग्स स्पेशल म्हणून साजरा केला जाणार आहे. किशोर दा यांची अत्यंत गाजलेली बहारदार गाणी ह्या शोच्या मंचाची रंगात वाढवणार आहे. या प्रसंगी या मंचास लोकप्रिय गायक अमित कुमार लाभणार आहेत. यावेळी हिमेश रेशमिया आपल्या प्रेक्षकांना वाचन देताना दिसणार आहे कि, किशोर दा आणि लता दीदींचे रिलीज न झालेले गाणे ते स्वतः रिलीज करतील.

इंडियन आयडॉल १२ मधील स्पर्धक अंजली गायकवाडने आपल्या सुरेल आवाजात ‘मेरे नैना सावन भादो’, ‘अरे यार मेरी तुम भी हो गझब’ आणि ‘पिया पिया पिया मोरा जिया या गाण्यांवरील परफॉर्मन्सने उपस्थित सगळ्यांना मंत्रमुग्ध केले. प्रमुख अतिथी अमित कुमार आणि तिन्ही परीक्षकांनी तिचे भरभरून कौतुक केले. त्याच वेळी हिमेश रेशमियाने एका गाण्यामागची कथा सांगितली, जे गाणे किशोर कुमार यांनी त्याच्या सुरुवातीच्या काळात गायलेले होते.

अंजलीच्या आवाजाचे कौतुक करत अमित कुमार म्हणाले, “ज्यावेळी ही गाणी किशोर कुमार यांनी म्हटली, त्या वेळी त्यांनी गाण्याचे प्रशिक्षण घेतलेले नव्हते. आज तुझी ही प्रतिभा पाहून हे लक्षात येत आहे की, तुझ्या वडिलांनी तुला सुर आणि तालाची उत्तम समज दिली आहे आणि तुझा आवाज देखील आकर्षक आहे.”पुढे हिमेश रेशमिया म्हणाले, “त्या वेळेस माझे वडील विपिन रेशमिया यांनी किशोरदांच्या आवाजात एक गाणे रेकॉर्ड केले होते, ज्यात शास्त्रीय संगीताची छटा होती. आजही ते गाणे माझ्याजवळ आहे, जे तेव्हा रिलीज होऊ शकले नव्हते. पण हे माझे वचन आहे की, मी ते गाणे रिलीज करेन. कारण किशोरदा आणि लता दीदींनी म्हटलेले ते माझ्या वडिलांचे कंपोझिशन आहे.”

पुढे त्यांनी डबिंगच्या रिहर्सल वेळेचा किस्सा सांगताना म्हटले, “लताजींनी अप्रतिम परफॉर्मन्स दिला आणि जेव्हा किशोरदांनी लताजींनी म्हटलेले गाणे ऐकले, तेव्हा त्यांनी तत्काळ सांगितले की, आता रेकॉर्डिंग कॅन्सल. कारण आता मीच पुरुष आणि स्त्री अशा दोन्ही आवाजात गाणार आहे आणि पुढे ते म्हणाले, लताजींनी हे खूपच छान गाईले आहे पण मला याचा सराव करावा लागेल.” किशोरदा माझ्या वडिलांना बर्‍याचदा फोन करत असत. किशोरदांनी त्या गाण्याचा बराच सराव केला आणि मग ते रेकॉर्ड केले. हे लता आणि किशोर कुमार यांनी म्हटलेले गाणे मी नक्कीच रिलीज करीन, जे तेव्हा रिलीज होऊ शकले नव्हते.”