Take a fresh look at your lifestyle.

प्रोस्थेटिक मेकअप करणं जीवावर बेतलं; प्रसिद्ध अभिनेत्रीने रुग्णालयीन उपचारांनंतर सांगितली आपबिती

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। रुपेरी पडद्यावर झळकणारे कलाकार सुंदर आणि मोहक दिसण्यासाठी एक अप्रतिम असा लूक परिधान करतात. यामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग असतो तो म्हणजे मेकअप. हा मेकअप कलाकारांना विविध पद्धतीने प्रेक्षकांसमोर उभा करण्यासाठी सक्षम असतो. पण कधी कधी हाच मेकअप एखाद्या व्यक्तीसाठी धोकादायक बनवू शकतो याची कधी कुणी कल्पनासुद्धा केली नसेल. पण असेच काहीसे झालेय एका अभिनेत्रीसोबत. मेकअपमुळे तिला थेट रुग्णालयात दाखल व्हावं लागलं होत. चित्रपटात रोल करण्यासाठी, अभिनेत्रीने प्रोस्थेटिक्स मेकअप केला आणि यामुळे तिला अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं.

‘छोरी’ या चित्रपटात माईची भूमिका साकारलेली अभिनेत्री यानिया भारद्वाज हिच्या सोबत हा प्रसंग घडला आहे. चित्रपटात भुताचा लूक देण्यासाठी तिला प्रोस्थेटिक्सचा वापर करून मेकअप केला आणि परिणामी तिची तब्येत बिघडली. यामुळे तिला थेट रुग्णालयात दाखल करावं लागलं. चित्रपटातील तिच्या परिवर्तीत भूमिकेबद्दल सांगताना ती म्हणाली कि, प्रोस्थेटिक्स करायला किमान ३-४ तास घालवायला लागयचे आणि हा मेकअक उतरवायलाही किमान २ तास लागायचे. मला बाकीच्यांपेक्षा खूप आधी सेटवर जायला लागायचं.

पुढे, माझ्यासाठी भूताचे रूप साकारणे हा खूप कठीण प्रवास होता. कारण हा लूक खूपच अवघड होता. स्क्रीनवर दिसत त्यापेक्षा कितीतरी जास्त कठीण. माझ्यासाठी ते एक वॅक्सिंग अनुभवासारखं होतं. ते काढताना पोटाभोवतीचे लहान लहान छोटे केस बाहेर यायचे. कधी कधी तर पुरळ यायचा. तर कधी त्यातून रक्त यायला लागायचं. माझे हात आणि चेहरा प्रोस्थेटिक्सने झाकलेला होता. मला जेवताही येत नव्हतं. मला रोज वेदनाशामक औषधे घ्यावी लागत होती. यामुळे कधी कधी तापसुद्धा यायचा.

पुढे, या सगळ्यात माझी तब्येत बिघडली आणि माझ्या फुफ्फुसात सूज आली होती. त्यामुळे मला रुग्णालयात दाखल करावं लागलं. खूप कमी लोकांना प्रोस्थेटिक्स करून घेण्याची संधी मिळते आणि मी त्यापैकी एक होते. मी स्वतःला खरंच खूप भाग्यवान समजते. सिने जगात प्रोस्थेटिकचा अर्थ असा नाही की, तुम्ही कसे दिसता, त्यात तुम्ही कसे वागाल हे महत्त्वाचं आहे. मला माहित नव्हतं की प्रोस्थेटिक माझं शरीर आणि आरोग्य खराब करेल. शूटिंगच्या शेवटच्या दिवशी मी काहीही खाऊ शकले नाही. मी काहीही पिऊ शकत नव्हते, कारण जे काही खाणेपिणे होतं ते सगळं शरीरातून बाहेर पडत होतं. मला कोशिंबीरही पचत नव्हती.