Take a fresh look at your lifestyle.

किती पैसे खाल्ले या ट्विटसाठी?; आर्यन खानच्या जामीनासाठी प्रार्थना करणाऱ्या राम कदमांवर जनतेचा कोप

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मुंबई क्रूझ ड्रग्स पार्टी प्रकरणात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक झाल्यानंतर दोनदा त्याच्या जमीन याचिकेबाबत सुनावणी पुढे ढकलण्यात आली. अखेर आज त्याच्या जामिनावर सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. दरम्यान भाजपचे आमदार राम कदम यांनी यासंदर्भात ट्वीट केले असून आर्यनच्या जामिनासाठी चक्क प्रार्थना केली आहे. त्यांचे ट्विट पाहिल्यानंतर स्वतःला लोकप्रतिनिधी म्हणवणारे तुम्ही कुठे आणि काय बोलावं इतकं कळत नाही का? अशी टिकास्त्र लोकांनी केली आहेत.

या ट्विटमध्ये राम कदम म्हणाले की,'(१) प्रार्थना आहे की आज #आर्यनखानला जामीन मिळावा. संविधान अन कायद्या प्रमाणे जामीन मिळणे हा एक मूलभूत अधिकार आहे. ही लढाई कोणा एक व्यक्ति विशेषच्या विरोधातील लड़ाई नाहीं अखंड मानव जातीची #ड्रग्स विरोधी लढाई आहे. अपेक्षा होती #महाराष्ट्रसरकार निदान ह्या खतरनाक

(२) ड्रग्स प्रकरणात महाराष्ट्र सरकार ड्रग माफियांच्या विरोधात उभे राहील अशी अपेक्षा होती, पण खेळ त्यांच्यावरच उलटला. पीडीपी नेत्या मेहबूबा मुफ्ती यांनीही आगामी निवडणुकीसाठी या प्रकरणाचे भांडवल करण्याचा प्रयत्न केला. आपल्या घरातील तरुणांना पूर्णपणे उद्ध्वस्त करणाऱ्या ड्रगच्या विरोधात सर्व पक्ष आणि मानवजात एकत्र येऊ शकतात का?

(३)बरं, बदललेल्या भारताचा संदेश नक्कीच गेला आहे की कायद्यापुढे कोणी श्रीमंत, गरीब, नेता, अभिनेता नाही, सर्व समान आहेत. आता बदललेल्या भारतात कोणी श्रीमंत गरीब,नेता,अभिनेता असो कायद्याच्या समोर सर्वे समान आहेत़. भविष्यात आर्यनने ज्या ड्रग्सचा कलंक त्याच्या बदनामीचे कारण झाले. त्याने ड्रग्सच्या विरोधात प्रखर लढाई उभी करुन युवकांना ड्रग्स पासून दूर करण्यासाठी काम करून संकटाचे संधीत रूपांतर करावे, असंही राम कदम म्हणाले.

या सर्व प्रकारादरम्यान राम कदम यांनी आपले मत तर मांडले पण त्यांच्याकडे लोकप्रतिनिधी म्हणून पाहणारे लोक आता पेटून उठले आहेत. या ट्वीट्सवर लोकांनी अशी टीकास्त्र वापरली आहेत का बस्स. एकाने लिहिले कि, सर आर्यन खान तुमचा कोण आहे. मग आता पर्यंत सर्व पकडले गेले. त्याच्या साठी पण प्रार्थना करा. एका साठी प्रार्थना आणि बाकीसाठी पण प्रार्थना करा.

तर अन्य एकाने लिहिले तुमची ही प्रार्थना आम्ही जनतेने मान्य केली असती जर अशी प्रार्थना एका सामान्य व्यक्तिसाठी केली असती। का ते मनुष्य नसतात? फ़क़त फर्क असतो पैष्याचा। किती मिळाले तुला अशी ट्वीट करण्यासाठी? सगळे राजकारणी … माफ करा, सकाळी सकाळी नाको देवाचे नाव। पण तुमही समजकारण सोडून सगळे करता. आणखी एकाने लिहिले कि, NCP आणी तुमचात काय फरक राहिला?

खूप दुर्दैव आहे देशाच की देशा मधे असे नेते आहेत. तर अन्य एकाने संताप व्यक्त करत लिहिलं कि, NCP आणी तुमचात काय फरक राहिला? खूप दुर्दैव आहे देशाच की देशा मधे असे नेते आहेत.