Take a fresh look at your lifestyle.

पंजाबी गायकाच्या हत्येने अवघं बॉलिवूड हादरलं; दिग्गज कलाकारांकडून शोक व्यक्त

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला याच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली आहे. या घटनेचा सिने इंडस्ट्रीतून निषेध केला जातोय आणि यासह अनेक कलाकार सोशल मीडियावर आपला संताप व्यक्त करताना दिसत आहेत. सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येच्या वृत्ताने संपूर्ण मनोरंजन विश्वाला हादरा बसला आहे. हि घटना २९ मे २०२२ रोजी घडली. २८ वर्षीय गायक सिद्धू मुसेवाला यांच्यावर काही हल्लेखोरांनी ३० राउंड फायर करून हत्त्या केली. यानंतर त्यांना रुग्णालयात भरती केल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेवर शहनाझ गिल, मुनव्वर फारूखी, आसिम रियाज, मिका सिंग, सोनू सूद, अजय देवगण, कपिल शर्मा अशा अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दुःख आणि संताप व्यक्त केला आहे.

अजय देवगणने या घटनेवर दुःख व्यक्त करीत ट्विट केलय. यात त्याने लिहिलं कि, “वाहेगुरु सिद्धू यांच्या कुटुंबियांना आणि त्यांच्या जवळील माणसांना या कठीण प्रसंगामध्ये उभं राहण्याची ताकद दे. अजूनही या गोष्टीवर माझा विश्वास बसत नाही. सिद्धू यांच्या आत्म्याला शांती लाभो.”

याशिवाय कपिल शर्मा याने ट्विट करीत लिहिलेय कि, “सिद्धू म्हणजे एक उत्तम व्यक्ती आणि कलाकार. या कठीण प्रसंगामध्ये त्यांच्या कुटुंबियांना देवाने उभं राहण्याची ताकद द्यावी.” . याशिवाय सोनू सूदने सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येनंतर एक भावूक पोस्ट शेअर करताना ट्विटरवर सिद्धू यांचा त्यांच्या आईसोबतचा एक फोटो शेअर केलाय. हा फोटो शेअर करत आणखी एका आईचा मुलगा निघून गेला, असे त्याने म्हटले आहे. याद्वारे सोनू सूदने अप्रत्यक्षपणे या घटनेचा निषेध केला आहे.

तसेच पंजाबी गायक मीका सिंगने त्याच्या इंस्टाग्रामवर सिद्धू सोबतचा एक फोटो शेअर केलाय. सोबत कॅप्शन देताना मीका सिंगनं लिहिलं, “मी नेहमीच म्हणतो की, मला पंजाबी असल्याचा गर्व वाटतो. पण आज मला असं म्हणताना लाज वाटतेय. २८ वर्षांचा एक मुलगा जो एवढा प्रसिद्ध होता. ज्याचं भविष्य एवढं चांगलं होतं. पण त्याची पंजाबमध्ये पंजाबी लोकांनीच हत्या केली. देव त्याच्या आत्म्यासा शांती देवो. त्याच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. मी पंजाब सरकरला विनंती करतो की त्यांनी गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी.”

याशिवाय मीका सिंगनं सिद्धू मूसेवालासोबत एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्यानं लिहिलं, “तुझी खूप आठवण येतेय भाई. तू खूप लवकर निघून गेलास. तू तुझं काम, गाणी, तू कमावलेली प्रसिद्धी आणि हिट रेकॉर्ड्समुळे नेहमीच सर्वांच्या आठवणीत जिवंत राहशील. तुझी हिट लाइन #Dildanimadasidhumussewala ला तुझे चाहते नेहमीच लक्षात ठेवतील. देव तुझ्या आत्म्यास शांती देवो. सतनाम वाहेगुरू.”