Take a fresh look at your lifestyle.

अलविदा! पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या पार्थिवावर मूळ गावी अंत्यसंस्कार

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला याच्यावर काही हल्लेखोरांनी ३० राउंड फायर करून त्याची हत्या केल्यानंतर संपूर्ण पंजाब मध्ये शोक व्यक्त केला जातोय. हि घटना अत्यंत भयावह असून यामुळे पंजाबी सिनेइंडस्ट्रीच नव्हे तर संपूर्ण बॉलिवूड सिनेइंडस्ट्रीदेखील हादरली आहे. या घटनेचा इंडस्ट्रीतून संताप आणि निषेध व्यक्त केला जात आहे.

दरम्यान आज सिद्धू मुसेवालाच्या मूळ गावी मुसा येथे त्याच्या पार्थिवावर अंत्य संस्कार केले गेले. याआधी त्याच्या अंत्य दर्शनासाठी चाहत्यांची गर्दी झाल्याचे चित्र पहायला मिळाले. त्याच्या अंत्य यात्रेत अनेक चाहते साश्रू नयनांनी त्याला निरोप देण्यासाठी आले होते.

सिद्धू मुसेवालाच्या पार्थिवाला त्याच्या वडिलांनी शेवटची पगडी बांधली. यावेळी त्याच्या वडिलांच्या डोळ्यात ओघळलेले अश्रू त्यांच्या भावना किती तीव्र आहेत हे दर्शवित होते. तर सोशल मीडियावर हत्येदरम्यान गन शॉट होताना ऐकू येत असलेला व्हिडीओ आणि हत्येनंतर निर्जीव अवस्थेत पडलेल्या सिद्धूचा व्हिडीओ व्हायरल होतोय. हे व्हिडीओ पाहून कुणाच्याही पायाखालची जमीन सरकेल.

मन हेलावणारी हि दृश्य अतिशय भीषण आहेत. याशिवाय आणखी एक व्हिडीओ व्हायरल होतोय ज्यात सिद्धूच्या पार्थिवासोबत त्याचे आई वडील वडील दिसत आहेत. मन खिन्न करणारे सुन्न चेहरे आणि थरथरणारे ओठ, ओघळणारे डोळे सारं काही अत्यंत भावुक करणारं आहे. अखेर अंत्य विधीनंतर मुखाग्नी संपन्न झाल्याचाही व्हिडीओ आता सोशल मीडियावर दिसतोय.दरम्यान त्याच्या वडिलांनी पगडी उतरवीत त्याला मुखाग्नी दिला. यावेळी त्यांच्या काळजाला किती दुःख झाले असेल या भावनेनेच अनेकांचे डोळे पाणावले आहेत.

आपल्या लाडक्या सिद्धूला निरोप देण्यासाठी चाहत्यांचा सागर लोटला होता. ज्याच्या त्याच्या डोळ्यात पाणी आणि सिद्धूच्या निधनाचा शोक प्रत्येकाच्या मनात असल्याचे दिसत होते. सिद्धूच्या मूळ गावी मुसा येथे त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले गेले. त्याच्या अंत्य यात्रेत मुसा गावातील प्रत्येक गावकरी आणि त्याच्या चाहत्यांचा समावेश आहे. मोठ्या गर्दीत सिद्धूची निरोपयात्रा पार पडली आणि अंत्य विधीवेळी सिद्धूचं शेवटचं गाणं ‘द लास्ट राइड’ वाजवण्यात आलं. यावेळी अनेकांनी सिद्धूला अखेरचा निरोप देत टाहो फोडला.