Take a fresh look at your lifestyle.

अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’चा जगभरात डंका; कमाईचा आकडा 300 कोटी पार

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दाक्षिणात्य सुपर स्टायलिश स्टार अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा द राइज’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा इतका चांगला प्रतिसाद मिळतोय कि बस्स. ‘पुष्पा’ हा चित्रपट तामीळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. यानंतर या प्रत्येक भाषेतील चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांनी चित्रपटाचे कथानक आणि चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाला दाद दिली आहे. तर पुष्पा चित्रपटाच्या हिंदी डबला राज्यात प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले आहे. बघता बघता या चित्रपटाने हिंदी व्हर्जनमधून ५० कोटींची कमाई केली आहे. तर जगभरातून या चित्रपटाने ३०० कोटींची कमाई केली आहे.

‘पुष्पा- द राईज’ या चित्रपटाच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डलवरून चित्रपटाच्या प्रदर्शनापासून आतापर्यंत झालेल्या एकंदर कमाईबाबत माहिती देण्यात आली आहे. या रिपोर्ट चार्टनुसार २०२१ सालातील सर्वाधिक कमाई करणारा ‘पुष्पा – द राईज’ हा चित्रपट ठरला आहे. मुख्य म्हणजे या चित्रपटाने जगभरातून जवळपास ३०० कोटी रुपयांहुन अधीकच कमाई केली असल्याचे समोर आले आहे. तर २०२२ मध्येसुद्धा अल्लू आणि रश्मिकाचा जळवा कायम राहील अशी आशा आहे.

‘पुष्पा- द राईज’ हा चित्रपट १७ डिसेंबर २०२१ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट जितक्या भाषांमध्ये प्रदर्शित झाला तितक्या भाषांमध्ये तो सुपर डुपर हिट झाला आहे आणि इतकंच नव्हे तर अजूनही हा चित्रपट हाऊसफुल चालू आहे. चित्रपटातील अल्लू – रश्मिकाची जोडी प्रेक्षकांना चांगलीच भावली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अभिनेता अल्लू अर्जुनने एका मुलाखतीत म्हटले होते कि पुष्पा चित्रपटाचे २ भाग असतील. त्यामुळे २०२२ मध्ये तो पुष्पा’चा पुढील भाग दिसेल अशी चर्चा आहे.