Take a fresh look at your lifestyle.

‘पुष्पा – द राईज’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर कोट्यावधींची कमाई

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नुकताच प्रदर्शित झालेला तेलुगू चित्रपट ‘पुष्पा- द राईज’ने बॉक्स ऑफिसवर बाकी सर्व चित्रपटांना पिछाडून चांगलीच मुसंडी मारली आहे. सध्या बॉक्स ऑफिसवर फक्त आणि फक्त पुष्पा चित्रपट कामे करताना दिसतोय. या चित्रपटात दाक्षिणात्य स्टायलिश स्टार अल्लू अर्जुन आणि नॅशनल क्रश रश्मिका मंदाना यांची नवीकोरी कमाल जोडी प्रेक्षकांचे मनोरंजन करीत आहे. रिलीजनंतरच्या अवघ्या दोन दिवसांत या चित्रपटाने १०० कोटींचा गल्ला केला आहे. त्याचवेळी, आता चार दिवसांत या चित्रपटाने जगभरात १४० कोटींचा व्यवसाय केला आहे. परिणामी अक्षय कुमारचा ‘सूर्यवंशी’ आणि सलमान खानचा ‘अंतिम’ मागे पडला आहे.

या चित्रपटाचे कथानक लाल चंदन तस्करी आणि त्यांच्या संघटनेला खाली आणण्याचा आरोप असलेल्या पोलिसांमध्ये हिंसाचार अशा काहीश्या स्वरूपाचे आहे. हे कथानक एकदम हटके असल्यामुळे प्रेक्षकांनी त्यास चांगला प्रतिसाद दिला आहे. याशिवाय चित्रपटातील सर्व गाणी हिट होण्याच्या मार्गावर आहेत.

पुष्पा चित्रपटातील अल्लू अर्जुन आणि रश्मिकाची जोडीदेखील प्रेक्षकांना चांगलीच भावली आहे. या चित्रपटातील गाणी लागताच प्रेक्षकांनी चित्रपट गृह दणाणून सोडला आहे. चित्रपटाला आयएमडीबी’ने ८.३ चे रेटिंग दिले आहे. तर प्रेक्षकांनी केलेली गर्दी पाहता प्रेक्षकांच्या उत्साहाबद्दल आणि प्रेमाबद्दल काय बोलायचं.

चित्रपटातील नायक आणि नायिकेच्या वर्कफ्रन्टबद्दल बोलायचं तर, रश्मिका मंदाना लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबत ती ‘मिशन मजनू’ या चित्रपटात दिसणार आहे. शिवाय अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘गुडबॉय’मध्येही दिसणार आहे.

तर अभिनेता अल्लू अर्जुनने एका मुलाखतीत म्हटले होते कि पुष्पा चित्रपटाचे २ भाग असतील. त्यामुळे २०२२ मध्ये तो पुष्पा’च्या पुढील भागात दिसेल अशी चर्चा आहे.