Take a fresh look at your lifestyle.

हुश्श..प्रतिक्षा संपली! ऍमेझॉन प्राइम व्हिडिओवर ‘पुष्पा- द राईज’ हिंदीत रिलीज

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ज्या चित्रपटाने गेल्या काही दिवसांपासून लोकांना अक्षरशः वेड लावल आहे तो चित्रपट म्हणजे पुष्पा- द राईज. हा चित्रपट मूळ तेलगू भाषिक असल्यामुळे बरेच प्रेक्षक आतुरतेने या चित्रपटाच्या हिंदी रिलीजची वाट बघत होते. पण आता प्रतीक्षा संपली आहे. त्यामुळे आनंदी व्हा आणि ऍमेझॉन प्राइम व्हिडिओवर ‘पुष्पा- द राईज’ हा चित्रपट हिंदी भाषेत बघा. होय १४ जानेवारी २०२२ या चित्रपटाचा हिंदी डब ऍमेझॉन प्राइम व्हिडिओवर रिलीज झाला आहे. अनेकांना अजून याबाबत माहिती नसल्यामुळे जे जे हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहेत त्यांनी आता बिंदास्त ऍमेझॉन प्राइम व्हिडिओवर ‘पुष्पा- द राईज’ एन्जॉय करा.

दाक्षिणात्य सुपरस्टार स्टाइलीश अभिनेता अल्लु अर्जुन आणि चुईमुई नॅशनल क्रश अभिनेत्री रश्मिका मंदाना यांचा बहुचर्चित ‘पुष्पा- द राइज’ सर्वात गाजलेला सुपर डुपर हिट चित्रपट आहे. बॉक्स ऑफिसवर कमाइचे रेकॉर्ड तोडत या चित्रपटाने प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. त्यामुळे अखेर हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर हिंदी भाषेत रिलीज झाला. मुळ तेलुगू असलेला हा चित्रपट मल्याळम, तमिळ, कन्नड आणि हिंदी भाषांमध्ये तूर्तास डब केला आहे. आता लाखो हिंदी भाषिक प्रेक्षक हा चित्रपट ऍमेझॉन प्राइम व्हिडिओवर पाहू शकतात.

अल्लु अर्जुन आणि रश्मिका मंदानाची लोकप्रियता पाहता या चित्रपटाने कमाईचा ८० कोटींचा आकडा पार केला आहे. या चित्रपटातील गाणी आणि ऍक्शन सीन सध्या चांगलेच लोकप्रिय ठरत आहेत. हा चित्रपट १७ डिसेंबर २०२१ ला प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. चित्रपटाचे कथानक, कलाकारांचा अभिनय आणि डायलॉगबाजी सगळंच कसं खतरनाक. यानंतर आता हिंदी भाषेमध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाल्याने त्याच्या कमाईत आणखी वाढ होणार, हे नक्की. ‘पुष्पा’ हा चित्रपट आंध्रप्रदेश- तमिळनाडूच्या सीमेवरील जंगलांमध्ये मिळणाऱ्या दुर्मिळ लाल चंदनाच्या विदेशात होणाऱ्या तस्करीवर आधारित आहे.