Take a fresh look at your lifestyle.

अखेर.. सुवर्ण पदकाची कमाई; माधवन पुत्र वेदांतचा डॅनिश ओपन’मध्ये डंका

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेता आर माधवन हा नेहमीच त्याच्या अभिनयासाठी चर्चेत असतो. मात्र गेल्या काही दिवसांपासून तो स्वतःमुळे नव्हे तर त्याच्या मुलामुळे चर्चेत आहे. याच कारण म्हणजे भारताच्या तरुण स्विमर्सने Danish Open 2022 या स्पर्धेत विशेष कामगिरी बजावली आहे. या तरुण स्वीमर्समध्ये मॅडीच्या मुलाचाही समावेश आहे. नुकतेच यात १५०० मीटर फ्री स्टाईल स्विमिंग स्पर्धेत वेदांत माधवन याने भारतासाठी रौप्य पदकाची कमाई केली होती. यानंतर आता ८०० मीटर पुरुष फ्री स्टाईल स्विमिंग विभागात त्याने थेट सुवर्ण पदकावर नाव कोरत अभिमानास्पद कामगिरी केली आहे. याविषयी माहिती देताना अभिनेता आर माधवन याने आपल्या मुलाचे विशेष कौतुक करणारी एक पोस्ट शेअर केली आहे.

अभिनेता आर. माधवनचा मुलगा वेदांत माधवनने डॅनिश ओपन स्विमिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. डेन्मार्कच्या कोपनहेंगनमध्ये ही स्पर्धा पार पडली. दरम्यान ८०० मीटर पुरुष फ्री-स्टाइल स्विमिंग विभागात वेदांतने सुवर्ण कामगिरी केली आहे. यामुळे आर. माधवनने आपल्या मुलाचे कौतुक करणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांना याबद्दलची पूर्ण माहिती दिली आहे. सोबत लिहिले कि, … ‘सुवर्णपदक… तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने आणि देवाच्या कृपेने विजयाचा हा प्रवास सुरूच आहे. आज ८०० मीटरमध्ये वेदांतने सुवर्णपदक पटकावलंय. या विजयाने मी भारावून गेलो आहे. प्रशिक्षक प्रदीप सर, स्विमिंग फेडरेशन आणि संपूर्ण टीमचे खूप खूप आभार.’

तसेच या स्पर्धेत अॅलेक्झांडर एल ब्योर्न याने रौप्य पदक जिंकले आहे. तर फ्रेडरिक लिंडहोमने कांस्य पदक जिंकले आहे. आर. माधवनने पोस्ट केलेल्या या व्हिडीओमध्ये वेदांत पदक स्वीकारण्यापूर्वी अॅलेक्झांडर आणि फ्रेडरिक यांच्याशी हस्तांदोलन करताना दिसतोय. त्याची हि नम्रतापूर्वक वागणूक सर्वाना भावतोय. माधवनने पोस्ट केलेल्या या व्हिडीओवर नेटकरी आणि विविध सेलिब्रिटी वेदांताचे कौतुक करीत त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करीत आहेत. यापूर्वी वेदांतने मार्च २०२१ मध्ये लॅटव्हिया ओपनमध्ये कांस्य पदक जिंकले होते. तर गतवर्षी ज्युनियर नॅशनल ॲक्वाटिक चॅम्पियनशिपमध्ये त्याने ४ रौप्य आणि ३ कांस्य पदके जिंकली होती. दरम्यान पुढे भविष्यात ऑलिम्पिक स्पर्धेत भारतासाठी पदक जिंकण्याचं वेदांतच स्वप्न आहे. या स्वप्नासाठी त्याला नेटकरी शुभेच्छा देत आहेत.