Take a fresh look at your lifestyle.

मॅडीच्या लेकाची कौतुकास्पद कामगिरी; Danish Open 2022’मध्ये भारतासाठी रौप्य पदकाची कमाई

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आपल्या लक्षवेधी अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता आर माधवन नेहमीच चर्चेत असतो. आजही मॅडी चर्चेत आहे मात्र कौतुक त्याच्या लेकाचं म्हणजेच वेदांत माधवनचं होतंय. याच कारण म्हणजे भारताच्या तरुण स्विमर्सने Danish Open 2022 या स्पर्धेत विशेष कामगिरी बजावली आहे. या तरुण स्वीमर्समध्ये मॅडीच्या मुलाचाही समावेश आहे. इतकेच नव्हे तर भारतासाठी त्याने रौप्य पदकाची कमाई केली आहे आणि त्यामुळे सर्व जस्तरावरून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मॅडीने आपल्या लेकाचे कौतुक करीत सोशल मीडियावर ट्विट केले आहे.

Danish Open 2022 या स्पर्धेमध्ये साजन प्रकाश आणि वेदांत महादेवन यांनी अनुक्रमे सुवर्ण पदक आणि रौप्य पदकाची कमाई केली आहे. या स्पर्धेच्या प्रथम दिनी भारताच्या या युवकांनी जोरदार कामगिरी केली आहे. यामध्ये जलतरणपटू आणि तब्बल २ वेळा ऑलिंपियन ठरलेला साजन प्रकाश याने २०० मीटर बटरफ्लाय प्रकारात १:५९:२७ अशी वेळ नोंदवली आहे. या सुवर्ण कामगिरीसाठी त्याला सुवर्णपदकाने गौरविण्यात आले आहे. दरम्यान याआधी प्रकाशची वैयक्तिक कामगिरी १:५६:३८ अशी सर्वोत्तम कामगिरी आहे. तर माधवनचा मुलगा वेदांत माधवन याने १५००m फ्री स्टाइल स्विमिंग प्रकारात अव्वल अशी कामगिरी बजावत रौप्य पदक पटकावले आहे. हे पदक पटकावण्यासाठी त्याने १५:५७:८६ अशी वेळ नोंदवली. या सर्वोत्तम कामगिरीसाठी त्याला रौप्य पदकाने गौरविण्यात आले आहे.

अभिनेता आर माधवन अर्थात तुमचा लाडका मॅडी याने सोशल मीडिया ट्विटरवर एक ट्विट पोस्ट करत वेदांत आणि साजन या दोघांचंही कौतुक करीत त्यांचे अभिनंदन केले आहे. शिवाय आपल्याला अत्यंत अभिमान वाटत असल्याचेदेखील माधवाने ट्वीट करीत म्हटले आहे. तर मुलांचे कोच प्रदीप सर यांचेदेखील माधवनने या ट्विटमध्ये आभार मानले आहेत. याशिवाय मॅडीने इन्स्टाग्रामवर वेदांतला पदक मिळतानाचा व्हिडीओदेखील पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्याने लिहिले आहे की, ‘वेंदात माधवनने भारतासाठी कोपनहॅगनमध्ये पार पडलेल्या Danish Open स्पर्धेसाठी रौप्य पदक जिंकले आहे. धन्यवाद प्रदीप सर. आम्हाला तुझा अभिमान आहे.’