Take a fresh look at your lifestyle.

‘राधेश्याम’मधला प्रभासचा फर्स्ट आला समोर ; पाहूया प्रभासचा जबरदस्त अंदाज

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | दाक्षिणात्य सुपरस्टार बाहुबली फेम अभिनेता ‘प्रभास’ हा आपल्या जबरदस्त अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत आला आहे. प्रभास तरुणांच्या गळ्यातील ताईत बनला आहे. आज या महान अभिनेत्याचा वाढदिवस आहे.वाढदिवसाच्या निमित्ताने प्रभासला राधे श्याम चित्रपटाच्या टीमने एक खास भेट दिली आहे. अलिकडेच प्रभासच्या आगामी राधे श्याम या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित झालं आहे.

प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये प्रभास एका लक्झरी गाडीला टेकून उभा असल्याचं दिसून येत आहे. या चित्रपटाचं चित्रीकरण जॉर्जिया येथे सुरु होतं. मात्र, करोना विषाणूमुळे घेण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे या चित्रपटाचं चित्रीकरण अर्ध्यावर राहिलं. त्यानंतर या चित्रपटाचं इटलीमध्ये चित्रीकरण सुरु आहे.

दरम्यान, ‘राधे श्याम’ या चित्रपटात प्रभास आणि पूजा हेगडे मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. यात प्रभास विक्रमादित्य ही भूमिका साकारत आहे, तर पूजा प्रेरणा ही भूमिका वठविणार आहे. सध्या सर्वत्र या चित्रपटाची चर्चा सुरु असून प्रेक्षकांमध्ये प्रभासला मोठ्या पडद्यावर पाहण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’