Take a fresh look at your lifestyle.

ईदच्या मुहूर्तावर ‘राधे’ होणार थिएटर आणि ओटीटीवर एकाच दिवशी प्रदर्शित; तर सत्यमेव जयते २ देणार टक्कर

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेता सलमान खानच्या ‘राधे’ या आगामी चित्रपटाची त्याचे चाहते गेल्या कित्येक दिवसांपासून आतुरतेने वाट पाहत आहेत. काही दिवसांपूर्वी सलमानने हा चित्रपट सिनेमागृहातच प्रदर्शित करण्याची घोषणा केली होती. पण कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार असल्याचे देखील बोलले जात होते. चित्रपटाविषयी आता एक नवी माहिती समोर येत आहे. हा चित्रपट येत्या १३ मे ला प्रदर्शित होणार आहे. इतकेच नव्हे तर त्याच दिवशी जॉन अब्राहमचा ‘सत्यमेव जयते २’ हा चित्रपट देखील प्रदर्शित होणार आहे. म्हणजे एकंदर काय तर ‘राधे’ आणि ‘सत्यमेव जयते २’ हे एकमेकांना जोरदार टक्कर देण्यास सज्ज आहेत

सलमानचा ‘राधे’ हा चित्रपट थिएटर आणि ओटीटी दोन्हीकडे एकाच दिवशी प्रदर्शित होणार आहे. येत्या १३ मे २०२१ रोजी, अर्थात ईदच्या मुहूर्तावर चित्रपटगृहात तो प्रदर्शित होईल. तसेच भारत सरकारने जारी केलेल्या कोरोनाविषयक नियमांचे पालन केले जाईल. झी५ वर ‘पे पर व्ह्यू सेवा झी प्लेक्स सोबतच भारतातील सर्व प्रमुख ओटीटी प्लॅटफॉर्म जे ‘झी ५’ शी संबंधित आहेत, तसेच डिश, डी २ एच, टाटा स्काय आणि एअरटेल हे प्रमुख डीटीएच ऑपरेटर डिजिटलवर हा चित्रपट पाहण्यास सक्षम राहतील. तर भेटूया उद्या म्हणत सलमानने आपल्या ऑफिशियल सोशल अकाउंटवर राधेचा टिझर उद्या प्रदर्शित होणार असल्याची माहिती दिली आहे.

‘भाई का कमिटमेंट, ईद पर एंटरटेनमेंट’, लिहिलेले चित्रपटाचे पोस्टर शेअर करून व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ही माहिती दिली आहे. झी स्टुडिओचे सीइओ शरिक पटेल म्हणाले, ‘या महामारीने आपल्याला काही तरी नवीन करण्याची संधी दिली आहे. सगळ्यात प्रथम हे नवीन वितरण धोरण आम्ही स्वीकारत आहोत याचा आम्हाला अभिमान आहे. आपल्या सर्वांना जवळच्या चित्रपटगृहांमध्ये नवीन चित्रपट पहायला आवडत असले तरी, आम्हाला वाटते आहे की, सलमानच्या चाहत्यांसाठी काहीतरी वेगळे करावे. एका वर्षापेक्षा जास्त काळ मनोरंजनाची वाट पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी ‘राधे’पेक्षा चांगला दुसरा कोणताही चित्रपट असू शकत नाही.’

मुख्य म्हणजे सलमानचा ‘राधे’ आणि जॉन अब्राहमच्या ‘सत्यमेव जयते २’ हे एकमेकांसाठी प्रतिस्पर्धक ठरणार आहेत. ‘राधे’ १३ मे रोजी प्रदर्शित होणार असून ‘सत्यमेव जयते २’ देखील त्याच दिवशी रिलीज होणार आहे. यापूर्वी ‘सत्यमेव जयते २’ १४ एप्रिल २०२१ रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र काही कारणास्तव चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली. आता हि स्पर्धा नक्की कोण जिंकणार हे पाहणे रंजक ठरणार आहे.