Take a fresh look at your lifestyle.

‘राधे- युअर मोस्ट वॉन्टेड भाई’ चित्रपटाचा ट्रेलर झाला रिलीज; पहा व्हिडीओ

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेता सलमान खान याच्या बहुप्रतिक्षित ‘राधे’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून हा चित्रपट चर्चेचा विषय झाला आहे. येत्या ईदच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. रिलीज झालेल्या ट्रेलरमध्ये सलमान जबरदस्त अ‍ॅक्शन सीन करताना दिसतोय. हा चित्रपट थिएटर आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर एकाच दिवशी रिलीज होणार आहे. त्यामुळे इंटरमेंट अगदी जोरदार होणार हे नक्की.

नुकताच रिलीज झालेला हा ट्रेलर २ मिनिट ५१ सेकंदाचा आहे. या ट्रेलरमध्ये शहरातील गुन्हेगारीचे प्रमाण आणि ड्रग्ज सप्लाय चा मोठा सापळा रचणारा एक खलनायक आहे. तर या गुन्ह्यांची मापणी करत गुन्हेगारांच्या नाकात वेसण घालणारा एक जबरदस्त नायक आहे. ‘राधे’ म्हणजे सलमान खान या चित्रपटातील मुख्य भूमिका गाजवीत आहे. तर रणदीप हुडा देखील हम भी किसीसे कमी नहीं अश्या अंदाजात किलर खलनायकाची भूमिका बजावीत आहे. हि सलमान आणि रणदीपची जोडी या चित्रपटाच्या कथानकाची रंगत वाढवीत आहे.

राधेचा टिझर रिलीज न करता थेट ट्रेलरच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. प्रत्येक चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होण्यापूर्वी टीझर रिलीज केला जातो. खरतर चित्रपटाचा पहिला लूक प्रदर्शित करता त्याला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. त्यामुळे निर्मात्यांना टीझर रिलीज न करता थेट ट्रेलरला जबरदस्त प्रतिसाद मिळेल असा विश्वास होता. हा ट्रेलर रिलीज करण्याच्या एक दिवस आधीच सलमानने चित्रपटाच्या रिलीज डेट आणि ट्रेलरबद्दल माहिती दिली होती. तसेच सलमानने चित्रपटाच्या प्रदर्शनाची घोषणा करताना चित्रपटगृहांच्या मालकांना सांगितले होते की, त्याचा चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये येणाऱ्या प्रेक्षकांच्या सुरक्षेची पूर्ण काळजी आपल्याला घ्यावी लागेल.

या चित्रपटामध्ये सलमान आणि रणदीप हूडा यांच्या जोडीसोबत अभिनेत्री दिशा पटनी व जॅकी श्रॉफ देखील मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रभु देवा यांनी केले आहे. हा चित्रपट येत्या १३ मे २०२१ रोजी प्रदर्शित होणार आहे. झी५ वर ‘पे पर व्ह्यू सेवा झी प्लेक्स सोबतच भारतातील सर्व प्रमुख ओटीटी प्लॅटफॉर्म जे ‘झी ५’ शी संबंधित आहेत, तसेच डिश, डी २ एच, टाटा स्काय आणि एअरटेल हे प्रमुख डीटीएच ऑपरेटर डिजिटलवर हा चित्रपट पाहण्यास सक्षम राहतील.

Leave A Reply

Your email address will not be published.