Take a fresh look at your lifestyle.

राधे चित्रपटातील रोमँटिक गाणे ‘सीटी मार’ होणार या दिवशी रिलीज

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नुकताच सलमान खानचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘राधे: युअर मोस्ट वॉन्टेड भाई’ चा ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटाबाबत आधीच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. मात्र आता ट्रेलर रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांच्या उत्सुकतेने परिसीमा गाठली आहे. या ट्रेलरमध्ये सलमान हटके ऍक्शन आणि जबरदस्त लूक मध्ये दिसत आहे. इतकेच नव्हे तर त्याची आणि रणदीप हुडा ची जोडी नक्कीच कमाल करणार अशी जोरदार चर्चा सुरु आहे. आता या चित्रपटातील सलमान आणि दिशाचे रोमँटिक गाणे येत्या सोमवारी रिलीज होणार आहे. हे गाणे रिलीज झाल्यानंतर मात्र चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखी वाढणार हे नक्की.

चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये सलमान खान आणि दिशा पटानी यांच्या ‘सिटी मार’ या गाण्याची झलक पाहायला मिळाली. त्यांच्या या गाण्यातील रोमँटिक सीन सध्या चर्चेचा विषय आहेत. सलमाने त्याची नो किसिंग पॉलिसी तोडली अशी चर्चा या ट्रेलरनंतर सुरु झाली. त्यामुळे आता चाहते हे गाणे रिलीज होण्याची वाट आतुरतेने पाहत आहेत. आज सलमान खान फिल्म्सने सोशल मीडियावर हे गाणे सोमवारी प्रदर्शित होणार असल्याचे जाहीर केले आहे.

‘राधे: युअर मोस्ट वॉन्टेड भाई’ या चित्रपटातील ‘सिटी मार’ हे गाणे दमदार नृत्य आणि रोमँटिक दृश्यांनी भरलेले आहे. या गाण्यात सलमान खान आणि दिशा पटानीची रोमँटिक केमिस्ट्री स्पष्ट दिसत आहे. या ट्रॅकचे संगीत देवी श्री प्रसाद यांनी दिले आहे. तर शब्बीर अहमद या गाण्याचे गीतकार आहेत. या गाण्याला कमल खान आणि इलिया वंतूर यांचा आवाज आहे. तर शेख जानी बाशाने हा पेप्पी डान्स नंबर त्याच्या स्टाईलमध्ये कोरिओग्राफ केला आहे.

सलमान खान सोबत दिशा पटानी, रणदीप हूडा आणि जॅकी श्रॉफ देखील या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसत आहेत. ‘राधे: युअर मोस्ट वॉन्टेड भाई’ हा चित्रपट सलमान खान फिल्म्सने झी स्टुडिओ समवेत सादर केला आहे. सलमान खान, सोहेल खान आणि रील लाइफ प्रोडक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड निर्मित हा चित्रपट यंदा ईदच्या निमित्ताने १३ मे २०२१ रोजी थिएटर आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट झी -5 वर ‘पे-पर-व्ह्यू’ सर्व्हिस झी प्लेक्सवर दिसणार आहे.