Take a fresh look at your lifestyle.

Congratulations मिस्टर अँड मिसेस वैद्य; राहुल- दिशाचा लग्नसोहळा मोठ्या दिमाखात संपन्न- पहा खास क्षण

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। टीव्ही जगतातील अत्यंत लोकप्रिय रिऍलिटी शो बिग बॉस १४चा स्पर्धक गायक राहुल वैद्य आणि अभिनेत्री दिशा परमार यांचे अफेअर चांगलेच गाजले. त्यानंतर आता हे कपल अधिकृत कपल झाले आहे. दोघांनीही आपापल्या कुटुंबातील सदस्य आणि जवळचे मित्र यांच्या उपस्थितीत एकमेकांसह साता जन्माची गाठ बांधली आहे. त्यांचा सोहळा अत्यंत दिमाखात पार पडल्यानंतर या लग्नसोहळ्याचे काही खास फोटो पहिल्यांदाच समोर आले आहेत. जे आता सोशल मीडियावर चांगलेच वायरल होताना दिसत आहेत. या फोटोंमध्ये दोघांच्याही चेहऱ्यावरचा एकमेकांना कायमस्वरूपी मिळवल्याचा आनंद अगदी ओसंडून वाहताना दिसतोय.

या सोहळ्यादरम्यान लग्न लागण्याआधी अर्थात वरमाला घालतेवेळी राहुलने दिशाच्या बोटात एक रिंग घातली आणि दोघांनी एकमेकांना मिठी मारली. या सोहळ्यासाठी राहुलने सोनेरी रंगाची शेरवानी आणि दिशाने लाल रंगाचा दुल्हन लेहंगा परिधान केला होता. सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ खूपच व्हायरल होत आहेत. राहुलचा जवळचा मित्र अभिनेता अली गोनीदेखील राहुलच्या लग्नात हजर होता. अली आधीपासूनच राहुलच्या लग्नाबद्दल खूपच उत्साही होता. शिवाय त्यांचे चाहतेसुद्धा दिशा- राहुलच्या लग्नाची फार प्रतीक्षा करत होते. बिग बॉस १४ शोदरम्यान राहुलने दिशाला लग्नासाठी प्रपोज केले होते. दिशाने व्हॅलेंटाईन डेनिमित्त बिग बॉसच्या घरात जाऊन राहुलला लग्नासाठी होकार दिला होता.

राहुल व दिशा दोघांची भेट हि मित्र मैत्रिणींच्या माध्यमातून झाली. त्यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली आणि या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. या दोघांच्या नात्यात सोशल मीडियाची मात्र महत्त्वपूर्ण भूमिका ठरली आहे. दिशानेच एका मुलाखतीत सांगितले होते की, ‘मला त्याचे एक गाणे आवडले आणि मी त्याच्या पोस्टवर लव्हची प्रतिक्रिया दिली ‘

 

त्याचवेळी राहुल म्हणाला होता की, ‘मला वाटलं की, ती इतकी सुंदर मुलगी आही, तर मी संधी कशी सोडू. मी दिशाला मेसेज केला आणि त्यानंतर आमचे संभाषण सुरू झाले आणि आम्ही फोन नंबरची देवाणघेवाण केली. लग्नानंतर राहुल दिशा हनीमूनला कुठे जाणार याची अद्याप कोणतीही योजना आखलेली नाही. त्यांना लग्नानंतर दोघांनाही मनसोक्त आराम करायचा आहे आणि कोरोना परिस्थिती पाहता त्यांनी कुठेही बाहेर जाण्याची योजना तूर्तास पुढे ढकलली आहे, असे त्यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.