Take a fresh look at your lifestyle.

आरारा….ज्युनिअर NTR’ च्या एन्ट्रीवर पैशाचा पाऊस..?; काय आहे व्हायरल व्हिडिओमागील सत्य?

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। शुक्रवारी २५ मार्च २०२२ रोजी सर्वत्र राज्यभरातील सिनेमा थिएटर्समध्ये बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित चित्रपट RRR प्रदर्शित झाला. एस.एस. राजामौली यांचा हा बहुचर्चित चित्रपट घोषणा झाल्यापासून चर्चेत राहिला आहे. या चित्रपटात साऊथ सुपरस्टार राम चरण आणि ज्युनियर NTR मुख्य भूमिकेत असल्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता काही औरच होती. यानंतर अखेर हा चित्रपट रिलीज झाला आणि पैशाचा पाऊस पडला. शुक्रवारी चित्रपट रिलीज झाल्यानंतर एका थिएटरमधला प्रसंग सोशल मीडियावर व्हिडिओच्या माध्यमातून व्हायरल होतोय. ज्युनिअर NTR ची एंट्री झाली आणि थिएटरमध्ये किल्लर बारिश झाली.

साऊथ सुपरस्टार रामचरण आणि जुनिअर NTR यांचा चाहता वर्ग असाही फार मोठा आहे. त्यामुळे यांची एक झलक पहायला चाहते वेड्यासारखी वाट पाहतात. त्यात चित्रपटातील दमदार एंट्रीवर टाळ्या शिट्ट्या तर रोजच्याच. पण यावेळी जुनिअर NTR च्या एन्ट्रीवर चाहत्यांनी अक्षरशः पैशाचा पाऊस पाडत त्याला प्रतिसाद दिल्याचं दिसून आलाय. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्रसिद्ध सेलिब्रेटी फोटोग्राफर विरल भयानीने हा व्हिडीओ शेअर केला आहे.

सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी याने हा व्हिडीओ अधिकृत सोशल मीडिया इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. याचे कारण म्हणजे, खरंतर या व्हिडिओमध्ये RRR चित्रपटातील जुनिअर NTR चा इंट्रोडक्शन सीन सुरु आहे. दरम्यान चाहते मोठमोठ्याने ओरडू लागतात आणि चिअरअप करत आनंद व्यक्त करू लागतात. इतकंच नाही तर स्क्रीनवर पैशांसारखं काहीतरी उधळत असताना दिसून येतात. दिसायला हे कागद हुबेहूब नोटांसारखेच वाटत होते. पण त्या नक्की नोटाच आहेत का? हे जाणून घेण्यासाठी लोक उत्सुक आहेत. तर काही लोकांना विश्वास आहे कि या नोटाच आहेत. पण अजूनही हे सिद्ध झालेलं नाही कि त्या खरंच नोटा होत्या कि आणखी काही.

या चित्रपटात ज्युनिअर एनटीआर, राम चरण, अजय देवगण, आलिया भट्ट, समुथिरकानी आणि अ‍ॅलिसन डूडी यांच्यासह अनेक भारतीय प्रसिद्ध कलाकार विविध भूमिकांमध्ये दिसून येत आहेत. या चित्रपटाचे डिजिटल प्रवाहातील भागीदार झी ५ तेलगू, तामिळ, मल्याळम आणि कन्नड आहेत. याशिवाय नेटफ्लिक्स हिंदी याचाही समावेश यात आहे. झी सिनेमा हिंदी, स्टार प्लस तेलुगु, स्टार प्लस तमिळ, एशियननेट मल्याळम, स्टार कन्नड हे सॅटेलाईट भागीदार आहेत. तर डिजिटल स्ट्रीमिंग पार्टनर (परदेशी भाषा) देखील नेटफ्लिक्स (इंग्लिश, कोरियन, टर्किश और स्पॅनिश) आहे.