राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी पुन्हा एकदा अडचणीत; विविध आरोपांसह शर्लिन चोप्राने केली FIR
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा पॉर्नोग्राफी प्रकरणातील अटकेनंतर खूप चर्चेत होता. या प्रकरणी पोलिसांनी ऍक्टर व मॉडेल शर्लिन चोप्राचे स्टेटमेंट घेतले ज्यात तिच्यावर ऑनलाइन पॉर्न बनवण्याचा आणि वितरित करण्याचा आरोप केला होता. यानंतर आता शर्लिनने राज आणि शिल्पाविरोधात पोलीस तक्रार दाखल केली आहे. शर्लिनने यांच्याविरोधात मानसिक आणि लैंगिक छळासह फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. शर्लिन तिच्या लीगल टीमसह जुहू पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली व तिने हि तक्रार दाखल केली. शर्लिनने तिच्या ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात तिने खुलासा केला आहे की, राज कुंद्राने तिचे केवळ शोषण केलेच नाही तर अंडरवर्ल्डची देखिल धमकी दिली.
मेरा अनुरोध है आदरणीय मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे जी से और मुंबई पुलिस से की पीड़िता को जल्द से जल्द न्याय मिले। 🙏@OfficeofUT @CPMumbaiPolice pic.twitter.com/okozEiSUkS
— Sherlyn Chopra 🇮🇳 (@SherlynChopra) October 16, 2021
एका मुलाखतीत माध्यमांशी बोलताना ती म्हणाली,”तुम्ही मुलींना त्यांचे शरीर दाखवण्याचे पेमेंट क्लिअर का करत नाही? तुम्ही त्यांची फसवणूक का करता? तुम्ही त्यांना टोपी का घालता ?” “हा एथिकल बिझनेस आहे का? तुम्हाला बिझनेसमॅन बनायचे आहे, तर टाटा कसे बिझनेस करतात ते शिका. नैतिकतेसह, ते जे वचन देतात ते पाळतातही आणि आपण काय करता? तुम्ही आर्टिस्टच्या घरी जाऊन त्यांचे लैंगिक शोषण करता. तुम्ही त्याच्या घरी जाऊन त्याला अंडरवर्ल्डची धमकी देता. ते म्हणतात कि लैंगिक अत्याचाराचे प्रकरण मागे घ्या अन्यथा तुमचे आयुष्य उध्वस्त होईल.”
दरम्यान शर्लिनने खुलासा केला की, ती २० एप्रिल २०२१ रोजी जुहू पोलिस स्टेशनमध्ये राज कुंद्राविरुद्धचा खटला मागे घेण्यासाठी हजर झाली होती. राज कुंद्रावर आणखी आरोप करत ती म्हणाली की,” २७ मार्च २०१९ रोजी राज रात्री उशिरा तिच्या घरी आला होता आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केले होते. तर, ”२७ मार्च २०१९ रोजी तिने राजच्या दबावाखाली फोटोशूट केले.” इतकेच नव्हे तर पुढील १० महिने राजने आपली दूसरी फर्म जेएल स्ट्रीममध्ये सामील होण्यासाठी तिच्या मागे गेला आणि फिटनेसशी संबंधित कन्टेंट अपलोड करण्यास सांगितले. शर्लिनने यापूर्वीही राजुवर असा आरोप केला होता की, त्याने तिला जबरदस्तीने किस केले होते. शर्लिन म्हणाली होती की,” तिने राज कुंद्राला मागे ढकलण्याचा खूप प्रयत्न केला, मात्र राज हे मान्य करीत नव्हता. ज्यामुळे ती घाबरून पळून गेली.”