Take a fresh look at your lifestyle.

पॉर्नोग्राफी प्रकरणात अटक झालेल्या राज कुंद्राला जामिन मिळणार?; उच्च न्यायालयात होणार सुनावणी

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अश्‍लील चित्रपट निर्मिती प्रकरणी अटक करण्यात आलेला उद्योगपती आणि बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याला अखेर मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. राज कुंद्राच्या अटकपूर्व जामीन अर्जावर येत्या २५ ऑगस्ट २०२१ रोजी अर्थात बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. पॉर्न फिल्म चित्रीकरण आणि आपच्या माध्यमातून प्रसारण या आरोपाखाली राज कुंद्राला १९ जुलै २०२१ रोजी अटक करण्यात आली. दरम्यान राज कुंद्राची अटकपूर्व जामीन याचिका सत्र न्यायालयाने रद्द केल्यानंतर त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

मुंबई सायबर पोलिसांनी नोंदवलेल्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने राज कुंद्राला अंतरिम दिलासा दिला आहे. त्याच्याविरुद्ध वेब सीरिजचा भाग म्हणून ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर अश्लील व्हिडिओ पोस्ट केल्याचा आरोप तक्रारीत होता. पोर्नोग्राफी प्रकरणाचा तपास करण्यासाठी मुंबई गुन्हे शाखेने एक विशेष तपास पथक तयार केले होते. मुंबई पोलिसांनी कुंद्राला मुख्य सूत्रधार मानले आहे. तर या प्रकरणात आतापर्यंत त्याची पत्नी, मॉडेल गेहाना वशिस्ट आणि शर्लिन चोप्रासह अनेकांची चौकशी करण्यात आली आहे.

तपासादरम्यान मुंबई गुन्हे शाखेने राज आणि शिल्पाच्या कार्यालयांवर तसेच एकापेक्षा जास्त वेळा छापे टाकले होते. छाप्यात, पोलिसांनी पुरावे म्हणून सर्व्हर, व्हिडिओ क्लिप आणि व्हॉट्सअ‍ॅप चॅट देखील जप्त केले होते. कुंद्रा व्यतिरिक्त, कंपनीचे कार्यकारी उमेश कामत आणि नातेवाईक प्रदीप बक्षी यांचीही अश्लील चित्रपट निर्मिती आणि वितरणाच्या बाबतीत चौकशी सुरू आहे. ब्रिटनमध्ये कंपनी चालवणाऱ्या बक्षी यांच्याकडे कंटेंट वितरणाची जबाबदारी होती.