Take a fresh look at your lifestyle.

पॉर्नोग्राफीतून राज कुंद्राने कमावला इतक्या कोटींचा गल्ला; जाणून घ्या

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। राज कुंद्रा पॉर्न व्हिडिओ प्रकरणी मुंबई गुन्हे शाखा तपास करत आहे. या प्रकरणात राज कुंद्राची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या भूमिकेविषयी सतत विचारणा केली जात आहे. चौकशीनंतर मात्र पोलिसांनी अद्याप तिला क्लीन चिट दिली नाही. पोलिस सर्व संभाव्य बाबींची चौकशी करत आहेत. हे प्रकरण समोर आल्यानंतर राज कुंद्रा आणि त्यांच्या कंपनीबद्दल अनेक प्रकारच्या बातम्या चर्चेत आल्या आहेत. असे म्हटले जात आहे की, या व्हिडिओंद्वारे त्याने 2023 पर्यंत त्याचे मोठे टार्गेट निश्चित केले होते.

पॉर्न व्हिडिओ प्रकरणात पोलिसांनी राज कुंद्राचे घर आणि ऑफिसची झडती घेतली असता त्यामध्ये मोठा डेटा सापडला आहे. पोलिसांना त्याच्या घरातून इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स आणि बरीच साधने सापडली आहेत, ज्यामुळे हे प्रकरण सोडविण्यात त्यांना मदत होईल. मीडिया रिपोर्टनुसार राज कुंद्रा या व्हिडिओंद्वारे बरेच पैसे कमावत होता आणि म्हणूनच त्याने 2023 सालासाठी आपले उत्पन्नाचे लक्ष्यही निश्चित केले होते. या अ‍ॅप्सच्या माध्यमातून 2023 पर्यंत 34 कोटींचा नफा मिळविण्याचे त्याचे लक्ष्य होते.

वास्तविक, राज कुंद्रा आणि त्याला भेटलेली लोकं ज्या अ‍ॅपसाठी काम करतात ते पेड सब्सक्राइबर्ससाठी होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राज कुंद्राने ऑगस्ट ते डिसेंबर 2020 पर्यंत हॉटशॉट्स ग्राहकांकडून 1.17 कोटी रुपये कमावले. ही कमाई Apple अ‍ॅप स्टोअरची आहे. डिसेंबर 2020 पर्यंत हे अ‍ॅप गुगल प्ले स्टोअरवरही होते, अशा परिस्थितीत पोलिसांकडून असा अंदाज लावला जात आहे की, यातूनही त्यांना चांगली रक्कम मिळाली असेल.

पॉर्न चित्रपटाच्या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने स्टेट बँक ऑफ इंडियाला कानपूरमध्ये अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्राची दोन स्टेट बँक खाती फ्रिज करण्याचे निर्देश दिले होते. या दोन बँक खात्यात कोट्यावधी रुपये जमा असल्याचे SBI अधिकाऱ्यांनी सांगितले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.