Take a fresh look at your lifestyle.

राज कुंद्रा पॉर्नोग्राफी केस – मुंबई हायकोर्टात सोमवारी होणार जामीन अर्जावर सुनावणी

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अश्लील चित्रपट निर्मिती आणि अ‍ॅपद्वारे प्रसारण केल्याप्रकरणी पोलिस कोठडीत असलेला उद्योगपती आणि शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्याने त्याच्या अटकेला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. आपली अटक बेकायदेशीर असल्याचे त्याने म्हटले आहे. तर टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार राजचे वकील सुभाष जाधव यांनी शुक्रवारी सांगितले की,”त्याच्या अशीलाला अटक करणे बेकायदेशीर आहे आणि त्याच्या एकाही व्हिडिओला पोर्नोग्राफिक म्हणता येणार नाही.” “पोलिसांनी आपल्या ४००० पानांच्या आरोपपत्रात आरोपीने केलेल्या कोणत्याही सेक्सुअल कृत्याचा स्पष्ट उल्लेख केलेला नाही. कोणताही असा व्हिडिओ नाही, जो कलम ६७ अ अंतर्गत बेकायदेशीर ठरवला जाऊ शकतो. याशिवाय कुंद्रावर जे काही कलम लादले गेले आहेत, त्यात जामीनही मिळू शकतो.

राज कुंद्रावर आयपीसी कलम ४२० (फसवणूक), ३४ (सामान्य हेतू), २९२ आणि २९३ (अश्लील आणि अश्लील जाहिराती व प्रदर्शनाशी संबंधित) आणि आयटी कायद्यातील कलम आणि महिलांचे अश्लील प्रतिनिधित्व कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात राज कुंद्राला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने १९ जुलै २०२१ (सोमवार) रात्री अटक केली होती. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, ते अश्लील कन्टेन्ट बनविण्याशी संबंधित असून काही अ‍ॅप द्वारे असे कन्टेन्ट प्रसारित करण्याशी संबंधित आहेत. मंगळवारी कुंद्राला न्यायालयात हजर केले असता, त्याला २३ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

अलीकडेच कोर्टाने त्याला जामीन देण्यासही नकार दिला आणि त्याची पोलिस कोठडी २७ जुलै २०२१ पर्यंत वाढविली आहे. वियान इंडस्ट्रीजकडून मिळणारी रक्कम ऑनलाईन सट्टेबाजीसाठी वापरली गेली असेल असा संशय देखील क्राइम ब्रँचच्या अधिकाऱ्यांना आहे. या प्रकरणात आतापर्यंत ११ लोकांना अटक करण्यात आली आहे. यात राज कुंद्राचा मेहुणा देखील सामील असून आज शिल्पा शेट्टी कुंद्राची ६ तास चौकशी करण्यात आली. शिवाय घरावर छापा मारून राज कुंद्राचा लॅपटॉप जप्त केला आहे. यासह गुन्हे शाखेने विविध अ‍ॅप ऑपरेटरकडून साडेसात कोटी रुपयांची रक्कमही जप्त केली आहे.