टीम, हॅलो बॉलीवूड । ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमामध्ये राज ठाकरेंची प्रकट मुलाखत घेण्यात आली. राज ठाकरेंमध्ये एक कलाकार उलगडून दाखवण्याचा प्रयत्न या मुलाखतीमध्ये मुलाखतकार अंबरीश मिश्र यांनी केला. अशीच आठवण सांगताना त्यांनी कॉलेजमध्ये असताना छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट बनवण्याची इच्छा होती असं सांगितलं.
ते म्हणाले “कॉलेजमध्ये असल्यापासूनचं माझं पहिलं प्रेम आहे हे चित्रपट निर्मिती, चित्रपट दिग्दर्शन हेच होतं. छत्रपती शिवाजी महाराजांवर एक चित्रपट करावा असा विचार मी कॉलेजमध्ये असताना केला होता,” असा खुलासा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका मुलाखतीमध्ये केला आहे.
राज म्हणाले कि, ‘गांधी’ या चित्रपटाचा प्रभाव राज यांच्यावर इतका होता की तो चित्रपट पाहून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट बनवण्याचा विचार केला होता. “मी कॉलेजला असताना गांधी चित्रपट पाहिला. गांधी पाहिल्यानंतर तेव्हा पासूनचं माझं एक स्वप्न आहे की छत्रपती शिवाजी महाराजांवर एक चित्रपट करावा. कॉलेजमध्ये असल्यापासूनचं चित्रपट निर्मिती, चित्रपट दिग्दर्शन हेच माझं पहिलं प्रेम होतं. खरंतर मी ऍनिमेशन चित्रपट करावा. वॉल्ट डिन्से स्टुडिओमध्ये जाऊन ऍनिमेटर म्हणून चित्रपट करावा अशी माझी इच्छा होती. पण त्यावेळेला आतासारखी माध्यमे नव्हती. कोणाला पत्र लिहियाचं कोणाशी बोलायचं. काय करायचं काहीच माहिती नव्हतं. पण गांधी पाहिल्यानंतर शिवाजी महाराजांवर चित्रपट बनवायचा असं वाटलं आणि त्यानंतर मी महाराज पण जास्त वाचायला सुरुवात केली. महाराजांवर खूप वाचलं. बरचं वाचल्यानंतर महाराजांवर चित्रपट होऊ शकत नाही हे माझ्या लक्षात आलं,” असं राज यांनी मुलाखतीमध्ये सांगितलं.