Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘मी यालाच चिरंजीवित्व म्हणेन..’; लता दीदींच्या स्मृतिदिनी राज ठाकरे भावुक

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
February 6, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, महाराष्ट्र, सेलेब्रिटी
0
SHARES
112
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। भारताची गानकोकिळा असा ज्यांचा उल्लेख केला जातो त्या दिवंगत लता मंगेशकर यांचा आज पहिला स्मृतीदिन. लता दीदींनी आपल्या स्वरांनी अनेक कान तृप्त केले आहेत. मात्र लता दीदींच्या निधनानंतर सप्तसुरातला एक स्वर हरपून जावा अशा यातनांचा चाहत्यांनी अनुभव घेतला. त्यामुळे लता दीदी हयात नसल्या तरीही हृदयात कायम आहेत. आज त्यांच्या स्मृती दिनानिमित्त अनेक चाहते, मनोरंजन विश्वातील मंडळी आणि राजकीय क्षेत्रातील दिग्गजही पुन्हा एकदा भावुक होताना दिसले आहेत.

…लता दीदींच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.#LataMangeshkar #LataDidi pic.twitter.com/QYN3aDCWkR

— Raj Thackeray (@RajThackeray) February 6, 2023

लता दीदींच्या स्मृती दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लता दीदींच्या आवाजाला चिरंजीवी असे म्हटले आहे. शिवाय येणाऱ्या नव्या पिढीचाही यामध्ये उल्लेख केला आहे. या पोस्टमध्ये राज ठाकरे यांनी लिहिलं आहे कि, ‘आज दीदींच्या निधनाला आज एक वर्ष झालं. मागच्या वर्षी नेमक्या ह्याच दिवशी, माझ्यासकट देशातील लाखो, करोडो लोकांना काहीतरी तुटल्याची भावना जाणवली. आणि ही भावना पुढे काही काळ मनात घर करून होती. पण काही काळाने दीदींचं गाणं पुन्हा कानावर पडलं आणि एक जाणवलं की मूर्त स्वरूपातील दीदी गेल्या असल्या तरी अमूर्त स्वरूपातील दिदी कायम राहणार’.

पुढे लिहिलंय कि, ‘माझ्यासारख्या अनेकांना दिदिंचा आवाज कधीही आणि कुठेही ऐकला तरी तो क्षणात ओळखता येईल, पण यापुढे कदाचित अनेक पिढ्या सुद्धा हा आवाज कोणाचा आहे हे चटकन जरी नाही ओळखता आल तरी तो तितकाच आत ओढत राहील, शांत करत राहील. चिरंजीवी होणं म्हणजे काय अस मला विचारलं तर मी ह्यालाच चिरजिवित्व म्हणेन. दीदींच्या आठवणी आहेत राहतील पण त्याहून अधिक खोल त्या माझ्यासकट करोडो लोकांच्या जाणिवांमध्ये राहतील. दीदींच्या स्मृतीस माझं विनम्र अभिवादन!’

 

Tags: Death AnniversaryLate Lata MangeshkarRaj ThackreyTwitter Postviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group