Take a fresh look at your lifestyle.

व्यथा वेश्येमागील स्त्री’ची..! एक विदारक सत्य घेऊन राजेश्वरी दिसणार अनोख्या रूपात; पहा व्हिडीओ

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। फँड्री’ हा एक असा चित्रपट आहे ज्या चित्रपटाने अख्खा महाराष्ट्र गाजवला. या चित्रपटातील मुख्य पात्र साकारणारी अभिनेत्री राजेश्वरी खरात आजही आणि अजूनही प्रेक्षकांच्या लक्षात शालू म्हणून राहिली आहे. लोक आजही तिच्यावर शालू म्हणूनच प्रेम करतात. हि शालू अर्थात लोकांची लाडकी अभिनेत्री राजेश्वरी खरात चांगलीच सक्रिय असते. इतकेच काय तर नेहमीच आपल्या चाहत्यांचे मन जिंकण्यात ती यशस्वी राहिली आहे. मात्र या वेळी ती अत्यंत वेगळा आणि वास्तवदर्शी विषय घेऊन एका अनोख्या रूपात प्रेक्षकांसमोर येणार आहे.

राजेश्वरी आता आधीपेक्षा अत्यंत वेगळी, धाडसी आणि बऱ्यापैकी बोल्ड झाली आहे.‘फँड्री’ नंतर आता आगामी काळात राजेश्वरी ‘रेड लाईट’ एक विदारक सत्य या चित्रपटात झळकणार आहे. ही बातमी स्वतः राजेश्वरीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केली आहे. नुकतेच तिने तिच्या आगामी चित्रपटाचे अनोखे पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये ती बेडवर बसलेली दिसत आहे. सोबतच तिने लाल रंगाची साडी परिधान केली असून केसांची वेणी घातली आहे. अशा लूकमध्ये ती अत्यंत आवेगे रागीट नजरेने भेदक मारा करताना दिसते आहे. हे पोस्टर शेअर करताना राजेश्वरीने लिहिले कि, “सौदा जरी केलास तू माझ्या शरीराचा, पण माझे अश्रू तू विकत घेऊ शकतोस का? बनते एक स्त्री वेश्या, पण खरच स्वईच्छेने का? प्रश्न हा सोडवून बघ समाजा, कळेल मग व्यथा वेश्येच्या मागच्या स्त्रीची तुला!”.

हे पोस्टर आणि कॅप्शन पाहून तुमच्याही लक्षात येईल कि, हा एका वैश्या असणाऱ्या स्त्रीवर आधारित चित्रपट असणार आहे. ‘रेड लाईट’ या चित्रपटाचे दिग्दर्शन अनमोल मुनगंटीवार यांनी केले आहे. तर चित्रपटाची निर्मिती निलेश नगरकर यांनी केली आहे. ‘फँड्री’ चित्रपटात अत्यंत साधी भोळी शालू साकारणारी राजेश्वरी अचानक एका आगळ्या वेगळ्या कथानकासोबत प्रेक्षकांसमोर नवीन भूमिका साकारणार आहे. त्यामुळे तिचे चाहते अत्यंत उत्सुक आहेत. अनेकांनी या पोस्टवर कमेंट करत तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.