Take a fresh look at your lifestyle.

राजकुमार राव घेऊन आलाय “लुडो” !!

बॉलिवूड अभिनेता राजकुमार रावने त्याचा येणार आगामी “लुडो” या चित्रपटाचा लूक चे छायाचित्र त्याच्या इंस्टाग्रामअकाउंट वर पोस्ट केले आहे. त्याने त्याच्या आगामी चित्रपटातील पहिला लूक शेअर केला आहे. या चित्रपटात राजकुमार एका मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे. मुलीच्या गेटअपमधील राजकुमारला ओळखणंही कठीण जात आहे. अनुराग बासूनीं या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.
त्याने त्याच्या इंस्टाग्रामअकाउंट वर पोस्ट केलेल्या छायाचित्रामध्ये तो मुलीच्या गेटअपमध्ये खूप वेगळ्या लुकमध्ये दिसत आहे.
यात त्याने हिरवा लेहंगा परिधान केला आहे. मोकळ्या लांब केसांचा विग लावला आहे. यावरुन अंदाज लावला जाऊ शकतो की त्यानं हा गेटअप कोणत्यातरी नाटकासाठी केला असावा. तर दुसरीकडे तो एका अतिशय अतरंगी मुलाच्या लुकमध्ये दिसतो आहे. त्याचा हा लुक रेट्रो आहे. ८० च्या दशकातील हेअरस्टाइलमध्ये तो एखाद्या जुन्या अभिनेत्याप्रमाणे दिसतो आहे.
अनुराग बासू दिग्दर्शित लूडो हा आगामी २०२० चा हिंदी डार्क एंथॉलॉजी कॉमेडी चित्रपट आहे. बासू आणि भूषण कुमार निर्मित या चित्रपटात अभिषेक बच्चन, राजकुमार राव, आदित्य रॉय कपूर, सान्या मल्होत्रा, फातिमा सना शेख, पंकज त्रिपाठी, रोहित सुरेश सराफ आणि पर्ल माने यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चाहत्यांना आता लुडोची उत्सुकता लागली आहे.

<p class="has-text-align-justify
//www.instagram.com/embed.js“>