Take a fresh look at your lifestyle.

‘मी तुला नेहमी माझ्या हृदयात ठेवीन..’; आईच्या आठवणीने राजकुमार झाला भावूक

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव हा आपल्या अभिनयाच्या जोरावर उभारलेला एक उत्तम आणि हरहुन्नरी अभिनेता आहे यात काही वादच नाही. राजकुमाराचे चाहते आणि फॉलोवर्स मोठ्या संख्येत आहेत. शिवाय तो सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतो. दिनांक ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त राजकुमारने सोशल मीडियावर एक खास फोटो शेअर करत एक भावनिक पोस्ट केली. यात त्याने लिहिलेल्या कॅप्शनमध्ये हे स्पष्ट दिसत आहे कि त्याला त्याची माँ ची अर्थात आईची आठवण येतेय आणि तो ६ वर्षांनंतरदेखील आईला अंतर देऊ इच्छित नाही.

राजकुमारने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया इंस्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो राजकुमारच्या लग्नाच्या दिवसाचा आहे. आईच्या फोटो फ्रेमसमोर राजकुमार आणि त्याची पत्नी पत्रलेखा उभे असल्याचे यात दिसत आहे. दरम्यान राजकुमार त्याच्या आईच्या फोटोकडे अत्यंत प्रेमाने पाहत आहे. आई मुलातील ओढ या फोटोतून अगदी स्पष्ट दिसून येतेय. राजकुमारने त्याच्या दिवंगत आईच्या आठवणीत ही खास पोस्ट लिहिली आहे. जी सोशल मीडियावर फार व्हायरल झाली असून त्याचे चाहतेही भावुक झाल्याचे पाहायला मिळाले.

या पोस्टमध्ये राजकुमारने लिहिले आहे कि, ‘माँ, तू आम्हाला सोडून ६ वर्षे झाली पण मला माहित आहे की तू नेहमी माझ्यासोबत आहेस. मी तुला नेहमी माझ्या हृदयात ठेवीन आणि मला माहित आहे की तू नेहमीच मला मार्गदर्शन करण्यासाठी, माझं रक्षण करण्यासाठी, माझ्यावर प्रेम करण्यासाठी आणि मला आशीर्वाद देण्यासाठी तिथे आहेस. तू नेहमीच माझा हिरो राहशील. खूप प्रेम माँ’. या पोस्टवर त्याची पत्नी पत्रलेखा हिने कमेंट केली आहे. ‘माँ तुला वरून पाहत असेल आणि नेहमीच तुझ्यासोबत असेल.’