हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी चित्रपट सृष्टीतील अत्यंत प्रामाणिक, लोकप्रिय आणि पडद्यामागील प्रसिद्ध कलाकार, मराठी मालिका व चित्रपट सृष्टीतील कला दिग्दर्शक राजू साप्ते यांनी गेल्या शनिवारी अर्थात ३ जुलै २०२१ रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. तत्पूर्वी त्यांनी एक सुसाईड न आणि व्हिडीओ केला होता. यात त्यांनी म्हटले होते कि, मनोरंजन विश्वातील कामगार संघटनांच्या पदाधिका-यांच्या जाचाला कंटाळून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले आहे. या घटनेनंतर संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टी हादरली आहे. दरम्यान राजू साप्ते यांना न्याय मिळवून देण्यासाठी कलाकार मंडळी आणि मनसे आक्रमक झाल्याचे दिसून आले. यात अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी दुःख आणि खंत व्यक्त करीत ठाकरे बंधूंकडे न्यायाची मागणी केली आहे.
दिवंगत कला दिग्दर्शक राजू साप्ते यांना न्याय मिळवून देण्यासाठी सध्या अनेको पडद्यामागील कलाकार एकजुट झाले आहेत. तर काही कलाकारांनी सोशल मीडियावर राजू साप्ते यांना न्याय द्या, अशी मागणी करत पुढाकार घेतला आहे. अभिनेत्री निवेदिता सराफ यांनीदेखील एक व्हिडीओ शेअर करत साप्ते यांना न्याय मिळवून देण्याची मागणी सरकारच्या पुढ्यात आणून स्पष्ट केली आहे आहे. अतिशय गुणी आणि सज्जन कलादिग्दर्शक राजू साप्ते यांच्या परिवाराला न्याय मिळालाच पाहिजे. राजू साप्ते यांना न्याय द्या. मी मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती करते, असे म्हणत निवेदिता यांनी सरकारकडे न्यायासाठी पहार लगावली आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वायरल होत असून अनेकजण या व्हिडिओतील मुद्द्यांचे समर्थन करीत आहेत.
हा व्हिडीओ निवेदिता सराफ यांनी इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. दरम्यान या व्हिडिओमध्ये त्या बोलताना दिसत आहेत कि, आज हा व्हिडिओ शेअर करताना मला अतिशय दु:ख होतंय. आमचे कलादिग्दर्शक राजू साप्ते यांनी आत्महत्या केली. इतक्या टॅलेंटेड, मितभाषी आणि मनमिळावू माणसाला हे इतकं टोकाचं पाऊल का उचलावं लागलं? मी ‘अग्गंबाई सूनबाई’ या मालिकेच्या निमित्ताने राजू साप्ते यांच्या संपर्कात आले होते. ते फारच टॅलेन्टेड होते. अवघ्या तीन ते चार दिवसांत त्यांनी आमच्या मालिकेचा सेट उभा केला होता.
राजू यांना न्याय मिळायलाच हवा. त्यांनी ज्या लोकांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली आहे त्यांचा शोध तुम्ही घ्यायला हवा. माझी सर्व संबंधित व्यक्तींना, माननीय मुख्यमंत्र्यांना, राज ठाकरे यांना आणि अमेय खोपकर यांना कळकळीची विनंती आहे, की या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन, जी काही कीड लागलीये, ती समूळ उखडून टाकली पाहिजे. खरतर राजू दादांच्या कुटुंबियांचे आपण काय सांत्वन करणार. यासाठी आपल्याकडे शब्दच नाहीयेत. पण त्यांना न्याय नक्कीच मिळायला पाहिजे.
Discussion about this post