Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘राखीचा वार… आदिलचा पलटवार’; मिया- बीवीचा ड्रामा काही संपेनाचं

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
February 6, 2023
in Trending, बातम्या, रिलेशनशिप, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Rakhi_ADil
0
SHARES
3.4k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आईच्या निधनानंतर राखी सावंत प्रचजण्ड कोलमडलेली दिसली. पण तिच्याकडे तिचा आधार म्हणून नवरा आदिल आहे याची तिला खात्री असल्याचे ती वारंवार बोलताना दिसली. पण अचानक तिने आदिलवर एकापेक्षा एक गंभीर आरोप लावले आणि आपल्या नात्यात कटुता आल्याचे म्हटले.

View this post on Instagram

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511)

एका अन्य मुलीमुळे आदिल आणि तिच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स असल्याचे तिने म्हटले आहे. तिचा दावा आहे कि, आदिलचे तीन मुलींसोबत प्रेमसंबंध आहेत म्हणून त्याने आपले लग्न लपवण्यास भाग पाडले. शिवाय त्या मुलींनाही राखीने खुली धमकी दिली आहे. एव्हढ्या सगळ्यांनंतर जेव्हा अदिलने माध्यमांमध्ये प्रतिक्रिया दिली तेव्हा राखीने मात्र किल्ल्या उलट्या फिरवल्याचे दिसले आहे.

राखीचा नवरा आदिल खान दुर्रानी यांने त्याच्या अधिकृत इंस्टा स्टोरीवर एक लांब लचक नोट शेअर केली होती. यात लिहिले होते कि, ‘मी स्त्रीच्या पाठीमागे बोललो नाही तर याचा अर्थ असा नाही कि मी चुकीचा आहे. कारण मी माझ्या धर्माचा आदर करतो आणि मी महिलांचा आदर करायला शिकलो आहे. ज्या दिवशी मी माझे तोंड उघडून काय चालले आहे आणि ती माझ्याशी कशी वागत आहे याबद्दल बोललो तर त्यानंतर ती तिचे तोंड उघडू शकत नाही. म्हणूनच तिला रोज येऊन लोकांना सांगायचे आहे की, आदिल वाईट आहे. पण मी म्हणेन कि, मला सुशांत सिंग राजपूत बनायचे नाही. ती म्हणते, आदिल मुंबई माझी आहे, काहीही होऊ शकत. तर मी सर्वांना विनंती करू इच्छितो की हे सर्व सोडून द्या. कोण कसं आहे हे लवकरच कळेल.’

View this post on Instagram

A post shared by India Forums (@indiaforums)

आदिलच्या या पोस्टनंतर राखी सावंतचा एक नवा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. ज्यामध्ये राखी म्हणाली की, तिला सर्वांना गुड न्यूज द्यायची आहे. या व्हिडिओत राखी सावंत म्हणते आहे कि, ‘मला देशातील जनतेला एक आनंदाची बातमी द्यायची आहे की, माझा आदिल आता माझ्याकडे परत आला आहे. आज पुन्हा आनंदाचे भाव माझ्या चेहऱ्यावर उमटले. आता आम्ही दोघे एकत्र काम करू. आता आमचे नाते खूप चांगले आहे. आता काहीही चूक होणार नाही.

View this post on Instagram

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511)

नाजूक नात्यात काय बोलावे तेच कळत नाही. माझ्या डोक्यावर आघात आणि दबाव होता. मी जरा घाबरलो होतो. मी माझ्या आदिलची बदनामी करणार नाही. आदिल माझा आणि माझा नवरा आहे. तो नेहमीच माझा असेल आणि कधीही कोणाकडे जाणार नाही.’ आता या प्रकरणात कोण खरं आणि कोण खोत हे कळायला थोडा वेळ लागेल. पण नेटकऱ्यांनी मात्र या भांडणात काहीही रस नसल्याचे आधीच स्पष्ट केले आहे.

Tags: Adil Khan DurraniDrama Queen Rakhi SawantHusband Wife RelationInstagram PostViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group