Take a fresh look at your lifestyle.

थोडी भाजी, थोडा प्रमोशन… पी.पी.इ. किट घालून ड्रामा क्वीन रस्त्यावर

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या वर्षभरापासून कोरोनाने नुसता धुमाकूळ घातला आहे. याचा थेट परिणाम सिनेसृष्टीवर पडत आहे. परिणामी आपला चित्रपट लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्याचे प्रमोशन थोडे युनिक थोडे हटके केले जात आहे. अशातच आता सलमान खानचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘राधे – युअर मोस्ट वॉन्टेड भाई’ रसिकांच्या भेटीला येण्याकरीता सज्ज झाला आहे. नुकताच त्याचा ट्रेलरदेखील प्रदर्शित झाला आहे. काही दिवसांपूर्वी राखी सावंतला आईच्या ऑपरेशनसाठी सलमान खान याने मदत केली होती. यामुळे आता राखी पीपीइ किट घालून रस्त्यावर उतरली आहे. अगदी सेफ्टी घेऊन सलमाच्या चित्रपटाचे रस्त्यावर प्रमोशन करतेय. एवढंच नव्हे तर सोबत भाजी पण खरेदी करतेय. तिचे हे व्हिडीओ अगदी जोरदार वायरल होऊ लागले आहेत.

इतरांना मास्क लावा, काळजी घ्या, घराबाहेर पडू नका सांगत फिरणारी राखी आता चक्क पीपीई किट घालून रस्त्यावर फिरतेय. नुसती फिरत नाहीये तर रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला थांबवून थांबवून सलमानचा राधे चित्रपट पाहण्यासाठी सांगतेय. हे नुसतं ऐकीव नसून हा व्हिडीओ प्रचंड वायरल होताना दिसतोय. या व्हिडिओत राखी पी.पी.इ. किट घालून राधे चित्रपटाचे पी पी इ विथ राधे प्रमोशन करताना अगदी स्पष्ट दिसतेय. सोबतच लोकांनी इतरांना पी.पी.इ. वाटा. मी पण वाटतेय असे राखी म्हणाली.

राखीला प्रमोशन करतेवेळी पोलिसांचीही भीती वाटतेय. ती म्हणतेय, पोलिसांनी जर तिला पाहिले की, तिच्यामुळे रस्त्यावर गर्दी होत आहे तर पोलिस मला मारतील. सलमानने राखीला तिच्या आईच्या ऑपरेशनसाठी मदत केली आहे. आता तिच्या आईवर उपचार सुरु आहेत. त्यामुळे राखीची आई आता लवकरात लवकर बरी होऊन घरी परतणार आहे. याचे सारे श्रेय नक्कीच सलमान आणि सोहेल या दोघांनाही जाते.

राखी ‘बिग बॉस सीजन १४ ‘मध्ये स्पर्धक म्हणून असतानाच तिला आईच्या आजाराबद्दल कळले होते.आईच्या उपचारासाठी राखीजवळ पुरेसे पैसे नव्हते. शोमधून कमावलेल्या पैशातून ती आईचा उपचार करू इच्छित होती. अशावेळी सलमान खान आणि सोहेल खान तिच्या मदतीला धावले. राखीच्या आईच्या उपचाराचा सर्व खर्च त्यांनी आपल्या खांद्यावर घेतला. वेळीच सलमानने केलेल्या मदतीमुळे राखीच्या आईची तब्येत आता स्थिर आहे. लवकरच ती बरी होऊन घरी परतणार आहे. दरम्यान शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर राखीने ढसाढसा रडून सलमान आणि सोहेलचे आभार मानले होते. अगदी भररस्त्यात बसून जमिनीला डोकं टेकून तिने सलमानचे आभार मानले होते. तिचा हा भावुक व्हिडीओ देखील प्रचंड वायरल झाला होता.